पुण्यातल्या शाळांना सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी ; मंगळवारीही राहणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 06:53 PM2019-08-05T18:53:33+5:302019-08-05T18:57:40+5:30

पावसामुळे राज्यात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन पुणे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.6) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

Holiday declared due to flood by collector for Pune and dIstrict schools | पुण्यातल्या शाळांना सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी ; मंगळवारीही राहणार बंद 

पुण्यातल्या शाळांना सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी ; मंगळवारीही राहणार बंद 

googlenewsNext

पुणे: पावसामुळे राज्यात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन पुणे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.6) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.त्यामुळे शाळा महाविद्यालयांना सलग दोन दिवस सुट्टी मिळाली आहे.


पुणे जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये.याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी दिली होती आता मंगळवारी सुध्दा सुट्टी जाहिर केली आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी,,वेल्हा आणि जुन्नर या तालुक्यांमध्ये शनिवार पासून अतिवृष्टी सुरू झालेली आहे. त्यातच मुंबई हवामान विभागाने येत्या सहा ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्र व गोवा राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

Web Title: Holiday declared due to flood by collector for Pune and dIstrict schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.