शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात फडणवीस विरुद्ध पवार 'होर्डिंग'युद्ध ; भाजपच्या 'विकासपुरुष'ला राष्ट्रवादीचं 'कारभारी लयभारी'नं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 19:52 IST

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी येत आहे.

पुणे : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी येत आहे. हा योगायोग असला तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. मात्र ऐकतील ते कार्यकर्ते कसे? पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी करत एकमेकांना आव्हान दिले आहे. 

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पावधी सरकारच्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. आणि आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या उंबरठ्यावर पुण्यात फडणवीस आणि पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीकडून जोरदार 'पोस्टरबाजी' द्वारे शक्तिप्रदर्शन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांसह देवेंद्र फडणवीसांनी देखील आपापल्या कार्यकर्त्यांना वाढदिवस साध्यापणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्या आवाहनाला फार गांभीर्याने न घेता कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी जोरदार पोस्टरबाजी केली आहे. 

पुणे शहर भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा 'विकासपुरुष' असा उल्लेख असलेले फ्लेक्स अनेक ठिकाणी लावले आहे. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून अजितदादांचे 'कारभारी लयभारी' असा उल्लेख फ्लेक्स सगळीकडे लावण्यात आले आहे. या निमित्ताने या शहरात झळकत असलेल्या फ्लेक्सचा चर्चेचा विषय ठरत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतर प्रमुख राजकीय पक्षांमधील 'पोस्टर युद्ध' आणखी वाढत जाणार असल्याची शक्यता आहे.

अमोल मिटकरींचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा ... पुण्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांना शुभेच्छा देणारे बॅनरबाजी केली आहे.तसेच त्यांचा पुण्याचे शिल्पकार असा उल्लेख करण्यात आला आहे.मात्र याचवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार.. मला वाटतं,यापेक्षा दुसरा मोठा जोक असू शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त..अशा शब्दात निशाणा साधला आहे.

 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस