शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

HMPV Virus Cases : नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष;पुणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क

By राजू हिंगे | Updated: January 6, 2025 20:33 IST

चीनमध्ये एचएमपीव्ही या साथरोग आला आहे. अनेक राज्यांमध्ये हा विषाणू पसरलेला आहे.

पुणे : देशात एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले असल्याने पुणे महापालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क करत उपाययोजना सुरू केल्या आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केला आहे.

चीनमध्ये एचएमपीव्ही या साथरोग आला आहे. अनेक राज्यांमध्ये हा विषाणू पसरलेला आहे. या विषाणूची लागण बंगळुरूमधील एका आठ महिन्यांच्या मुलीलाही झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यासंदर्भात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून पुणे महापालिकेलाही खबरदारीसाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. बंगळुरूमध्ये एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेला सतर्क राहण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.पुणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा तयार आहे. महापालिकेने अजून कोणाचेही थुंकीचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवलेले नाहीत. हिवाळ्यामध्ये ताप, खोकला येण्यासह अतिअशक्तपणा येणे, उलट्या होणे, ताप वाढणे, श्वसनास त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल व्हावे.

विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू केलेली नाही

देशात एचएमपीव्हीचा रुग्ण आढळला आहे; पण पुणे महापालिकेने लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू केलेली नाही. त्यामुळे या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. याबाबतचा निर्णय पुढच्या बैठकीत घेतला जाईल, पुण्यातील लोहगाव विमानतळावर देशभरातील विविध शहरांतून विमाने येतात. रोज हजारो प्रवाशांची तेथे वर्दळ असते. बंगळुरू येथूनही पुण्यामध्ये विमानांची ये-जा आहे; पण अजूनही महापालिकेने विमानतळावर प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरू केलेली नाही. त्यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे.

लोहगाव विमानतळावर अद्याप प्रवाशांची तपासणी सुरू केलेली नाही. पुढच्या बैठकीत याबाबतचा निर्णय केला जाईल. या विषाणूंची चर्चा होत असली तरी त्यास घाबरू नये. - डॉ. नीना बोराडे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHMPV Virusह्युमन मेटापन्यूमोव्हायरसHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल