लासुर्णे येथे एसटी ड्रायव्हरला मारहाण, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 18:05 IST2018-04-28T18:05:59+5:302018-04-28T18:05:59+5:30
बारामती आगारातील बसच्या चालकाला गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.

लासुर्णे येथे एसटी ड्रायव्हरला मारहाण, गुन्हा दाखल
वालचंदनगर: वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील नऊदारे येथे एसटी बसचे ब्रेक फेल झाले होते. ही बस दुरूस्त करण्यासाठी मेकॅनिकलला घेऊन येणाऱ्या बारामती आगारातील बसच्या चालकाला गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. ही घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत शंकर नारायण यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी राहुल रामदास मिसाळ (रा. बेलवाडी ता. इंदापूर ) या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वालचंदनगर बारामती गाडीचे नऊदारे येथे ब्रेक फेल होते.त्या गाडीतील प्रवासी दुसऱ्या गाडीत बसवत बारामती आगारातील गाडी मेकॅनिकसह दुरूस्तीसाठी बोलावण्यात आली. त्या गाडीवर आर्ट मेकॅनिक शंकर नारायण भंडलकर हे (क्र. एमएच ४० एन ८३४९) घेऊन वालचंदनगरकडे येत असताना बेलवाडी नजीक रस्त्यावर कट मारल्याच्या कारणामुळे त्यांना लासुर्णे परिसरात दुचाकी (क्र. एमएच ४२ ए.ई.२८५३) आडवी घालत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास वालचंदनगर पोलीस ठाण्यायाचे पोलीस महेंद्र फणसे करत आहेत.