Pimpri Chinchwad: वाहनाला धडकले, कापून टाकू म्हणत महिलेसह तिच्या मित्राने केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 12:36 IST2024-01-04T12:36:02+5:302024-01-04T12:36:52+5:30
मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाकड पुलाजवळ सोमवारी (दि. १) सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली....

Pimpri Chinchwad: वाहनाला धडकले, कापून टाकू म्हणत महिलेसह तिच्या मित्राने केली मारहाण
पिंपरी : भरधाव चारचाकीने धडक दिल्याने वाहनाचे नुकसान झाले. त्यानंतर चारचाकी चालक महिलेने आणि तिच्या मित्राने वाहनचालकाला शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाकड पुलाजवळ सोमवारी (दि. १) सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली.
सिद्धार्थ सुरेश नायर (२७, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडीपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मनीषा शिवाजी कुदळे (३२, रा. धनकवडी, पुणे) आणि यश पांडुरंग पवार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नायर हे त्यांच्या चारचाकी वाहनामधून मुंबई-बंगळुरू महामार्गाने जात होते. वाकड पुलाजवळ त्यांच्या वाहनाला पाठीमागून एका चारचाकीने धडक दिली. त्यामध्ये नायर यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर संशयितांनी नायर यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावर धावून येत कापून टाकतो, अशी धमकी दिली.