his lines took shape and found hundreds of criminals ; story of Artist Girish Charavad | त्याच्या रेषांनी घेतला आकार आणि सापडले शेकडो गुन्हेगार 

त्याच्या रेषांनी घेतला आकार आणि सापडले शेकडो गुन्हेगार 

पुणे :कलाकार हे साधारण व्यक्तींपेक्षा अधिक संवेदशील असतात असं म्हणतात. पण त्याच कलाकाराने सामाजिक संवेदना जपायचं ठरवलं तर काय होऊ शकतं याच उदाहरण म्हणजे डॉ गिरीश चरवड. आपल्या कलेच्या जोरावर केवळ शाब्दिक वर्णनावरून संशयित गुन्हेगारांचे रेखाचित्र काढून पोलिसांना विनामूल्य मदत करणाऱ्या चरवड यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 'सी-गॅरी' नावाने ते'ही चित्रे काढतात.      

या सगळ्याची सुरुवातही मोठी रंजक आहे. पुण्यातील एका महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या चरवड यांना असं काही काम करायचं डोक्यातही नव्हतं. अर्थात प्रत्येकाला मदत करण्याचा स्वभाव त्यांच्यात मूलतः होताच. एकदा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संशयित व्यक्तीचे छायाचित्र बनवण्याचा त्यांच्या मित्राचा प्रयत्न सुरु होता आणि अगदी सहजच त्याने सांगितले. त्यांनी प्रयत्न करून बघितला आणि त्यात यशही आले. त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलं नाही. आजपर्यंत ५०० पेक्षा अधिक व्यक्तींची रेखाचित्रे त्यांनी काढली आहेत. या काळात अनेक अधिकारी आले, बदलले पण चरवड मात्र काम करत राहिले. त्यांची अनेक रेखाचित्रे प्रत्यक्ष गुन्हेगाराशी ८० ते ९० टक्के जुळल्याचेही बघायला मिळाले आहे. नुकतीच त्यांनी 'चित्रकलेचे गुन्हे अन्वेषणातील योगदान' विषयवार पीएचडी पूर्ण केली. याच विषयावरील त्यांच्या प्रबंधाचे प्रकाशन आणि त्याचा नागरी सत्कार येत्या बुधवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. 

१९९३ सालापासूनच्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडापासून सुरु झालेल्या त्यांच्या या कामाची माहिती खूप कमी जणांना माहिती आहे. तेही कधी स्वतःहून उल्लेख करणं टाळतात. या सगळ्या प्रवासाबद्दल ते सांगतात की, 'मला शिक्षण घेत असताना रेखाचित्र हा विषय होताच पण त्याचा असा उपयोग होईल असे कधीही वाटले नव्हते. प्रत्यक्षात जेव्हा माझे एखादे रेखाचित्र पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोचण्यास मदत करते त्याचा आनंद होतोच. शेवटी गुन्हा कोणताही असला तरी व्यक्तीवर आघात असतो, त्यामुळे रेखाचित्र काढताना मी प्रत्येकवेळी तेवढेच महत्व देतो. माझ्या कलेचे योगदान या देताना मला समाधान वाटते आणि मी कायमच पोलिसांना मदत करेन.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: his lines took shape and found hundreds of criminals ; story of Artist Girish Charavad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.