सनबर्न पार्टीच्या विरोधात हिंदू जनजागृती समिती करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:51 IST2017-10-03T16:50:35+5:302017-10-03T16:51:23+5:30
पिंपरी- चिंचवडजवळील मोशी येथे आयोजित करण्यात येणाºया सनबर्न पार्टीच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सनबर्न पार्टीच्या विरोधात हिंदू जनजागृती समिती करणार आंदोलन
पुणे : पिंपरी- चिंचवडजवळील मोशी येथे आयोजित करण्यात येणाºया सनबर्न पार्टीच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. ८ आॅक्टोबरला मोशी येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
यंदाच्या वर्षी मोशी येथे २८ ते ३१ डिसेंबरच्या दरम्यान सनबर्न पार्टी होणार आहे. या विरोधात हिंदू जनजागृती समितीने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. पराग गोखले म्हणाले, पुण्यात वाघोलीजवळ गेल्या वर्षीही सनबर्न पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लाखोंच्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. यात अंमली पदार्थ आणि मद्यपानसेवन केले जात असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे तरुणांच्या मनावर विपरित परिणाम होत आहे. अशा पार्टीमुळे तरुण व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. सरकारने सनबर्नला देशातून हद्द पार करावे.
आत्तापर्यंत गोवा येथे सनबर्न पार्टी आयोजित केली जात असे. परंतु, तेथे होणाºया विरोधामुळे पुणे परिसरात सनबर्न पार्टीचे आयोजन सुरू झाले आहे. मोशी येथील मैदानावर यंदाच्या वर्षी ही पार्टी होणार आहे. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिकिटविक्री करण्यात येत आहे.