शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

Lonavala Rain: लोणावळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद; मंगळवारी २४ तासात तब्बल 275 मिमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 12:22 IST

रस्त्यावर जवळपास दीड ते दोन फूट पाणीच असल्याने नागरिकांना या पाण्यामधून वाट काढत प्रवास करावा लागतोय

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये यावर्षीच्या सर्वाधिक पावसाचे नोंद आज झाली आहेत मंगळवारी 23 जुलै रोजी 24 तासात शहरात तब्बल 275 मिलिमीटर (10.83 इंच) पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यापासून लोणावळ्यात पावसाला सुरुवात झाली या दीड महिन्यामधील मंगळवारी झालेला पाऊस हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. मागील गुरुवारपासून (18 जुलै) लोणावळा शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. 

सलग आठ दिवस शहरात पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी सुरू होत्या रात्री देखील वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला आहे. लोणावळा शहरामध्ये यावर्षी आज अखेरपर्यंत 2601 मिमी (102.40 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आज पर्यंत 2503 मिमी (98.54 इंच) पाऊस नोंदवण्यात आला होता. आज देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.      या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नांगरगाव आदर्श सोसायटी समोरील रस्ता, शहाणी हॉलिडे होम समोरील रस्ता, नारायणी धाम समोरील रस्ता, बापदेव मंदिरासमोरील वलवण गावाकडे जाणारा रस्ता, वलवण नांगरगाव रस्ता, बाजारभागातील रस्ते अशा अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. छोटे मोठे नाले हे ओसंडून वाहत असून इंद्रायणी नदीच्या पाणीपात्रात देखील मोठी वाढ झाली आहे. कार्ला, मळवली, सदापुर या भागामध्ये इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरले आहे. देवले ते मळवली या रस्त्यावर जवळपास दीड ते दोन फूट पाणीच असल्याने नागरिकांना या पाण्यामधून वाट काढत प्रवास करावा लागत आहे.

 

टॅग्स :PuneपुणेlonavalaलोणावळाRainपाऊसDamधरणTemperatureतापमानenvironmentपर्यावरणSocialसामाजिक