शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

उच्चशिक्षण क्षेत्राला ‘सीएचबी’चा लकवा..! प्राध्यापक भरतीकडे सर्वांचे लक्ष;सरकारकडून नुसती आश्वासने अन् गाजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:38 IST

- शिक्षणाची गंगा घराेघरी पाेहाेचावी. समाज शिक्षित व्हावा. सर्वसामान्यांची मुलं शिकून साहेब व्हावीत, या ध्यासाने संत आणि महापुरुषांनी कार्य केले.

उद्धव धुमाळे 

पुणे : घरची परिस्थिती फारच बिकट... इतकी भीषण की दिवसभर काबाड कष्ट केलं तरच रात्रीची चूल पेटते. त्यातूनही शिक्षणाची ओढ असल्याने रात्रीचा दिवस करून आम्ही शिकलाे. प्राध्यापक हाेणार आणि पुढील पिढी घडविणार हे उराशी स्वप्न हाेते. त्यामुळे मिळेल तसं अर्थ वेळ किंवा काही तास कष्टाची कामे करून शिक्षणाचा खर्च उभा केला. एम.ए.,एम.एस्सी, एम.टेक., एम.ए., आदी त्या-त्या विभागांतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्राध्यापक हाेण्यासाठी सेट-नेट परीक्षाही उत्तीर्ण झालाे. विशेष म्हणजे संशाेधन क्षेत्रातही मागे न राहता पीएच.डी. केली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर संशाेधन पेपर सादर केले, तरीही कायमस्वरूपी नाेकरी काही मिळेना. त्यामुळे मागील पंधरा-वीस वर्षांपासून तासिका तत्त्वावर (सीएचबी) किंवा करार पद्धतीने काम करीत आहे. ही व्यथा आहे सुरेश, किशाेर, सुधाकर, शिवाजी, राजर्षी, मनीषा, ज्याेती, पल्लवी आणि यांच्यासारख्या अनेकांची.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये केवळ एक-दाेन प्राध्यापक आहेत. विभागांतील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, यात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक अशा १११ पदांची प्रक्रिया सुरू आहे. याबाबतची सद्य:स्थिती काय ? अशी विचारणा केली असता अर्जांची पडताळणी सुरू आहे, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये विद्यापीठाने जगात ५६६ व्या स्थानी झेप घेतली. भक्ती-याेग कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विद्यापीठात आले असता भरती प्रक्रियेला सरकारने मान्यता दिली असून, ती लवकरच राबविले जाईल, अशा शब्दांत आश्वस्त केले हाेते. त्यावर कुलगुरू डाॅ. सुरेश गाेसावी यांच्याकडे विचारणा केली असता, भरती प्रक्रियेला गती दिली जाईल. पंधरा दिवसांत पुढील टप्पा पार पडेल, असे सांगितले. त्याचबराेबर विद्यापीठ पातळीवर करार पद्धतीने काही जागा भरल्या जातील, असे स्पष्ट केले हाेते. त्यानुसार करार पद्धतीने भरती करण्यासाठीची जाहिरातदेखील प्रसिद्ध झाली आहे; पण कायमस्वरूपी भरतीचं काय ? हा प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडला आहे.

सहन हाेईना अन् सांगताही येईना

शिक्षणाची गंगा घराेघरी पाेहाेचावी. समाज शिक्षित व्हावा. सर्वसामान्यांची मुलं शिकून साहेब व्हावीत, या ध्यासाने संत आणि महापुरुषांनी कार्य केले. ‘हातावर भाकर खा, पण मुलांना शिकवा. माेठा साहेब बनवा. जाे शिकत नाही त्याची अवस्था खटाराच्या बैलाप्रमाणे हाेईल,’ असे संत गाडगेबाबा सांगत. पण, शासन धाेरणांमुळे मागील वीस-तीस वर्षांत अशी स्थिती झाली आहे की, उच्च शिक्षण घेतलेल्यांच्या काेपऱ्याला गूळ लावून दिवस-रात्र राबून घेतले जात आहे. त्यांचे आर्थिक-मानसिक-शारीरिक छळ हाेत असून, ते सहन हाेईना आणि काेणाला सांगताही येईना, अशी त्यांची अवस्था झाली आहे.

याबाबत अतिशय दुर्गम भागातील सामान्य शेतकरी कुटुंबातला पहिल्या पिढीचा शिक्षित आणि मागील १५ वर्षांपासून पुण्यात ‘सीएचबी’वर काम करणारा प्रा. शिवम म्हणतात, चांगली नाेकरी मिळेल. पुढची आदर्श पिढी घडविण्याचे भाग्य मिळेल, या अपेक्षेने धडपड करीत आहे. यातच अर्धे वय उलटले. आमची अवस्था वेटबिगारी माणसापेक्षा वाईट झाली आहे. आता तरी भरती हाेऊन आधार मिळेल ही अपेक्षा आहे.

आमच्या संयमाचा अंत पाहू नका..!

मागील अनेक वर्षांपासून नाेकरीपासून वंचित असलेला डाॅ. सुधीर म्हणाले, मी २००८ सालापासून कधी तासिका, तर कधी करार तत्त्वावर नाेकरी करीत आहे. आज ना उद्या भरती सुरू हाेईल आणि आपल्यालाही अच्छे दिन येतील, या आशेवर काम करीत आहे. पण, जे वाट्याला येत आहे ते इतके भयानक आहे की, ते सहन हाेत नाही आणि काेणाला सांगू पण शकत नाही. वयाची पन्नाशी जवळ आली तरी ना घर, ना नाेकरीचा ठाव-ठिकाणा, त्यामुळे कुणी पाेरगीही देईना. सरकार बेराेजगार तरुणाईच्या संयमाचा अंत न पाहता पारदर्शकपणे आणि तत्काळ भरती करावी ही अपेक्षा आहे.

नवी अस्पृश्यता थांबणार कधी ?

शिक्षण क्षेत्रात सीएचबी आणि कायमस्वरूपी यांच्यात एक प्रकारची नवी अस्पृश्यता तयार झाली आहे. घाण्यावर जुंपलेल्या बैलाप्रमाणे आमची अवस्था झाली आहे. सरकार आठवड्यातील केवळ नऊ तास ‘सीएचबी’साठी ठेवतंय; पण महाविद्यालयामधील कायमस्वरूपी प्राध्यापक, प्राचार्य मात्र त्याच्याकडून दरराेज बारा-बारा तास काम करून घेतात. वर्षभरात केवळ नऊ ते दहा महिने काम. त्यातही तास हाेतील त्याप्रमाणे मानधन निघणार. महाविद्यालयाने मानधन काढले तरी उच्चशिक्षण सहसंचालक त्यात त्रुटी काढून आडून ठेवणार, असे करून सर्वच पातळीवर शाेषण आणि शाेषण सहन करावं लागत आहे, असे प्रा. श्रीधर सांगत हाेता. आता बास! हे थांबलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत हाेता. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय