उच्च न्यायालयाकडून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 18:37 IST2019-08-21T18:35:57+5:302019-08-21T18:37:40+5:30
गतवर्षी मराठा आरक्षण मोर्चास हिंसक वळण लागले होते. त्यावेळी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर ठपका ठेवून गुन्हा दाखल केला होता.

उच्च न्यायालयाकडून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा जामीन मंजूर
राजगुरूनगर: मुंबई उच्च न्यायालयाने माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अटकपूर्व अंतिम जामीन आज (२१ऑगस्ट) मंजूर केला. त्यामुळे मोहिते पाटील यांची अटक टळली आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) चाकण हिंसाचार प्रकरणी ठपका ठेवलेले आणि या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. चाकण मराठा आरक्षण मोर्चास हिंसक वळण लागले होते. गतवर्षी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर ठपका ठेवून गुन्हा दाखल केला होता. याबाबत अटकपूर्व जामीन अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश रेवती ढेरे यांच्या न्यायालयात याबाबत दिलीप मोहिते पाटील यांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. अॅड मनोज मोहिते व अॅड तपन थत्ते यांनी युक्तिवाद केल्याचे मोहिते पाटील यांच्या निकटवरतीयांनी सांगितले. त्यावेळी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करून त्यावर २१ऑगस्टला सुनावणी ठेवली होती. ती सुनावणी आज पार पडली. अंतरिम अटकपूर्व जामीन मंजुरीनंतर आज अंतरिम अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती ढेरे यांनी अंतिम मंजूर केला.