शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अहो ऐकलं का ? 'जशी सगळी पोरं पास तशीच सगळ्या शाळाही पास'..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 10:10 IST

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात एकही शाळा नापास नाही

- भरत निगडेनीरा : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील ५ हजार १५२ पैकी ४ हजार ६३२ प्राथमिक शाळांनी सहभाग घेतला होता. पुणे जिल्ह्यातील सहभागी सर्व शाळा पास झाल्या असून, राज्यस्तरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे प्रथम क्रमांक आलेला आहे. तर जि. प. प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन विभाग स्तरावर तिसरा क्रमांक आलेला आहे. राज्य शासनाच्या विद्यार्थी नापास न करण्याच्या धोरणाप्रमाणे एकही शाळा नापास झाली नाही.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षकप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या अभियानात जवळजवळ ९५ टक्के शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्येही झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात ४ हजार ६३२ शाळांचा सहभाग‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा'' अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात ४ हजार ६३२ शाळांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी राज्यस्तरीय १, विभागीय स्तरावर १, जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढलेला आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढले आहेत. काय आहे अभियानविद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.मूल्यांकनात हे निकष महत्त्वाचेअभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधेसाठी ३३ गुण, शासन ध्येयधोरण अंमलबजावणीसाठी ८४ गुण तर शैक्षणिक संपादणुकीसाठी ४३ गुण आहेत. सहभागी शाळांचे बृहन्मुंबई महानगरपालिका, अ व ब वर्ग च्या महानगरपालिका, उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रांतर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील गठीत समित्या शाळांच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करतात. मूल्यांकन समित्या शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन मूल्यांकन केले. प्रश्नावलीच्या स्वरूपात योग्य ती माहिती संबंधित शाळेकडून प्राप्त करून घेऊन आवश्यकतेनुसार स्थानिक पातळीवरील महाविद्यालयीन विद्यार्थी विशेषत: डी.एड, बी.एड या महाविद्यालयांचे विद्यार्थी यांची या कामासाठी मदत घेतील.अभियानात पात्र ठरल्यास हा फायदापारितोषिक बृहन्मुंबई महानगरपालिका व वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले २१ लाख, दुसरे १५ लाख व तिसरे पारितोषिक ११ लाख रुपयांचे असेल. उर्वरित महाराष्ट्रात ३५८ तालुक्यात पहिले ३ लाख, दुसरे २ लाख, तिसरे १ लाख, राज्यातील ३६ जिल्ह्यात पहिले ११ लाख, दुसरे ५ लाख, तिसरे ३ लाख तर ८ विभागीय स्तरावर पहिले २१ लाख, दुसरे १५ लाख, तिसरे ११ लाख रुपयांचे पारितोषिके देण्यात येणार आहेत. उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना तालुकास्तरावर पहिले ३ लाख, दुसरे २ लाख, तिसरे १ लाख, जिल्हास्तरीय पहिले ११ लाख, दुसरे ५ लाख, तिसरे ३ लाख, विभागस्तरीय पहिले २१ लाख, दुसरे १५ लाख, तिसरे ११ लाख तर राज्यस्तरीय शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पहिले ५१ लाख, दुसरे ३१ लाख व तिसरे २१ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढलेला आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढलेला आहे. अभियानामध्ये शाळा पास नापास ठरवलेला नाही."- अस्मा मोमीन : वरिष्ठ सहायक शिक्षणाधिकारी जि. प. पुणे प्राथमिक शिक्षण विभाग

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाCleaning tipsस्वच्छता टिप्सMaharashtraमहाराष्ट्रTeacherशिक्षकmarathiमराठीEknath Shindeएकनाथ शिंदे