G20 Summit: परदेशी पाहुण्यासाठी उद्या हेरिटेज वॉक; शनिवारवाडा ,लालमहाल, दगडूशेठची होणार सफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 19:48 IST2023-01-17T19:47:21+5:302023-01-17T19:48:05+5:30
दक्षिण आफ्रिका, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील, चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारत, इंडोनेशिया, रशिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आदींसह विविध देशांचे प्रतिनिधींचा समावेश

G20 Summit: परदेशी पाहुण्यासाठी उद्या हेरिटेज वॉक; शनिवारवाडा ,लालमहाल, दगडूशेठची होणार सफर
पुणे : जी २० परिषदेसाठी आलेल्या परदेशी पाहुणे हे बुधवारी (दि. १८ ) सकाळी ७ वाजता शनिवारवाडा ,लालमहाल, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर, नाना वाडा या ठिकाणी हेरटेज वॉक करणार आहेत. पुण्यात १६ आणि १७ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची जी-२० परिदेची बैठक झाली आहे.
जगातील ३४ देशातील ६६ हून प्रतिनिधी या बैठकीसाठी आले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिका, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील, चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारत, इंडोनेशिया, रशिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आदींसह विविध देशांचे प्रतिनिधींचा समावेश आहे. या सर्व परदेशी पाहुण्यांना सकाळी ७ ते ८.३० या वेळेत शनिवारवाडा ,लालमहाल, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर, नाना वाडा या ठिकाणी हेरटेज वॉक करणार आहेत. यावेळी चार गाईडच्या माध्यमातुन त्यांना ऐतिहासिक स्थळाची माहिती देण्यात येणार आहे.
शनिवारवाडा येथून १८ टन कचरा उचलला
जी २० परिषदेसाठी आलेल्या परदेशी पाहुणे हे शनिवारवाडा येथे भेट देणार आहे. त्यामुळे शनिवारवाडा आणि परिसराची पुणे महापालिकने साफसफाई केली. यामध्ये सुमारे १७ ते १८ टन कचरा उचलण्यात आला.