शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हॅलो मी बँकेतून बोलतोय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 20:07 IST

कोणालाही आपल्या बँक खात्याचा ओटीपी नंबर सांगू नका, असे बँका आणि पोलीस सांगत असतात़ असे असतानाही असंख्य सुशिक्षितच या जाळ्यात अडकता़त आणि आपला गोपनीय क्रमांक सांगून बसतात़

ठळक मुद्दे ज्येष्ठ नागरिक, महिला सायबर चोरट्यांचे लक्ष्य : अमिषाला पडतात बळीकोणतीही बँक कोणत्याही कारणासाठी तुम्हाला फोन करत नाही़

विवेक भुसेपुणे : हॅलो, मी बँकेतून बोलतोय, तुमच्या क्रेडिट कार्ड बंद होणार आहे़. ते सुरु ठेवण्याचे काम माझ्याकडे आहे़. तुमच्या कार्डची माहिती सांगा, असे सांगितल्यावर त्यावर ज्येष्ठ नागरिकांनी विश्वास ठेवून आपल्या कार्डची माहिती दिली़. काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून २ लाख रुपये काढले गेले़ पण ही गोष्ट त्यांच्या लक्षातच आली नाही़. दोन दिवसांनी त्यांच्या मुलीने त्यांचे बँक पासबुक भरुन आणल्यावर फसवणुक झाल्याचा हा प्रकार लक्षात आला़. कोणालाही आपल्या बँक खात्याचा ओटीपी नंबर सांगू नका, असे बँका आणि पोलीस सांगत असतात़ असे असतानाही असंख्य सुशिक्षितच या जाळ्यात अडकता़त आणि आपला गोपनीय क्रमांक सांगून बसतात़. त्यानंतर त्यांच्यावर पश्चातापाशिवाय दुसरा काही पर्याय रहात नाही़, अशा असंख्य तक्रारी देशाभरातील पोलिसांकडे दररोज येत असतात़ त्यात प्रामुख्याने उच्च शिक्षण घेतलेले, मध्यमवयीन पुरुष, महिला तसेच सेवानिवृत्तांची संख्या अधिक आहे़ त्यातुलनेत गरीब आणि अतिउच्च वर्गातील लोकांची संख्या अतिशय कमी असल्याचे दिसून येते़ .पोलीस, रिझर्व्ह बँक याबाबत नियमितपणे सावधगिरीच्या सूचना करत असते़ उच्च शिक्षित त्या वाचतही असतात़ पण जेव्हा त्यांच्यावर असा प्रसंग येतो, तेव्हा या सर्व सूचना विसरुन ते आपला ओटीपी क्रमांक देऊन बसतात़ त्यात प्राध्यापिका, नोकरदार इतकेच काय सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तही सायबर चोरट्यांच्या या आमिषाला बळी पडले असल्याचे दिसून आले आहेत़.मुंबई, पुणे, नागपूर, ठाण्यासह महाराष्ट्रात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा गोपनीय क्रमांक विचारुन बँक खात्यातून पैसे काढून घेतल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे़. गेल्या वर्षी अशा सुमारे १३ हजाराहून अधिक केसेस समोर आल्या होत्या़. याशिवाय ज्यांनी पोलिसांकडे तक्रार केली नाही अशांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे़ त्यामुळे अशा गोष्टींकडे सर्वांनी लक्ष देणे व माहिती घेणे आवश्यक आहे़ .अशी घ्या खबरदारी* लोक आपल्याजवळच्या अगदी पती पत्नी एकमेकांना अनेक गोष्टी सांगत नाही़ पण कोणीतरी पहिल्यांदा फोन करतो़ काही सांगतो आणि ज्याला कधीही पाहिले नाही त्याच्यावर चटकन विश्वास ठेवतो आणि आपली गोपनीय माहिती देऊन टाकतो़.* एक कायम लक्षात घ्या की कोणतीही बँक कोणत्याही कारणासाठी तुम्हाला फोन करत नाही़. त्यामुळे असा कोणताही बँकेतून बोलतोय असे सांगितले तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका़ .* विविध मॉलमध्ये बक्षीसाच्या आमिषाने फॉर्म भरुन देताना तुमचा मोबाईल क्रमांक देतात़ .विविध वेबसाईटवर माहिती भरताना तुमचा बँक खाते क्रमांक व इतर माहिती देता़ त्यातून तुमची माहिती लिक झालेली असते़. सायबर चोरटे या माहितीचा आधार घेऊन तुम्हाला तुमच्या खात्याची माहिती सांगता़त, त्यामुळे तुमचा त्यावर विश्वास बसतो़ त्यातून तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते़ मात्र, तरीही कोणालाही गोपनीय क्रमांक सांगू नये़ * आपल्या बँक खात्याचा पासवर्ड नेहमी बदल रहा आणि तो कोठेही लिहून ठेवू नका़ .* लॉटरी अथवा अन्य गोष्टी कधी तुम्ही खरेदीच केल्या नाहीत, त्याबद्दल बक्षीस लागल्याचा फोन आला तर हुरळून जाऊ नका़ कारण समोरचा माणूस गोड बोलून तुमची माहिती काढून घेऊन फसवणूक करण्याची शक्यता असते़.फसवणूक झाल्यास काय करावे* चुकून तुमच्याकडून गोपनीय क्रमांक, ओटीपी दिला गेला व ही गोष्ट नंतर लक्षात आल्यावर तुम्ही तातडीने बँकेकडे याबाबत तक्रार देऊन कार्ड ब्लॉक करायला सांगावे़ .* डेबीट / क्रेडिट कार्ड फ्रॉडचे बाबतीत खातेदाराने ओटीपी शेअर केला गेला असेल तर बँकेकडून फसवणूक झालेली रक्कम रिफंड केली जात नाही़ अशा प्रकारच्या गुन्ह्यात विविध मर्चंट/वॉलेटमध्ये पैसे गेलेले असतात़, तेव्हा तुम्ही तातडीने जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास पोलिसांकडून संबंधित मर्चंट/वॉलेट यांना मेलद्वारे पत्रव्यवहार करुन तक्रारदार यांना त्यांची रक्कम रिफंड करुन दिली जाते़, त्यामुळे अशी फसवणूक झाल्याचे लक्षात येतात तातडीने सायबर क्राईमकडे तक्रार करावी़ .

* सुशिक्षितच नव्हे तर सायबर साक्षर होण्याची आवश्यकत.* सायबर चोरटे हे प्रामुख्याने परराज्यातील असल्याने त्यांच्यापर्यंत पोहचणे अवघड.*  गोपनीय माहिती विचारुन फसवणूकीच्या प्रमाणात दिवसेंदिवस होतेय वाढ.* बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून भुलविण्याचा वाढते प्रमाण. 

कोणतीही बँक तुम्हाला फोन करुन माहिती विचारत नाही, हे पक्के लक्षात ठेवले तर फसवणूकीची शक्यता टळते़. तुम्हीच तुमची माहिती अनेक ठिकाणी दिलेली असते़. ती सायबर चोरट्यांपर्यंत पोहचते़ तुमचे बँकेशी नियमित व वारंवार व्यवहार होत असेल़ चालू खाते असेल तर खात्याविषयी विशेषत: चेकच्या संदर्भात फोन येण्याची शक्यता असते़. अशा वेळी आलेल्या फोनवर उत्तर देण्याऐवजी तुम्ही उलट तुमच्याकडील बँकेच्या फोन करुन आवश्यक माहिती घेऊन योग्य ती माहिती द्यावी़. त्यातून फसवणूक टळू शकेल़.अ‍ॅड़ गौरव जाचक, सायबर तज्ञ 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस