Pune Rain Video: मान्सूनच्या आगमनापूर्वीच धडकलेल्या पावसाने पुण्यात दाणादाण उडवली. मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांना कालव्याचे स्वरूप आले. शहरातील भागात पाणी साचल्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रात्रीपर्यंत पावसाची संततधार कायम होती. पुण्यातील कोंढवा, शिवाजीनगर, औंध, बाणेर, जेएम रोड, एफसी रोड, हिंजवडी, कात्रज चौक या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला.
वाचा >>मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
पुण्यातील कात्रज चौकातील दृश्य
पुण्यातील कोंढवा भागात असलेल्या जेके पार्क
कोंढवा परिसरात असलेल्या जेके पार्क भागात तर रस्त्यांना पूर आल्यासारखीच स्थिती होती. वाहणाऱ्या पाण्याच्या वेगाने उभी केलेली वाहनेही खाली पडली.
दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील सिंहगड रोडवर राजाराम पुलापासून ते वडगावपर्यंत झालेल्या नवीन उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळाली.
कोंढवा परिसरात घरात शिरले पाणी
मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती, तर काही ठिकाणी पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.