विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, गुरुवारी राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 18:18 IST2018-05-16T18:18:17+5:302018-05-16T18:18:17+5:30

येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.

heavy rainfall in Vidharbha, possibility of rain everywhere in the state on Thursday | विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, गुरुवारी राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता

विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, गुरुवारी राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता

ठळक मुद्देमराठवाड्यातील तापमानात काहीशी वाढदेशभरात आसाम, मेघालय, दक्षिण तामिळनाडु आणि केरळला जोरदार पाऊस

पुणे : कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. तसेच गुरुवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे़. 
गेल्या २४ तासात पणजी  गोंदिया फोंडा या भागात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या स्थानिक हलक्या पावसामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे़. मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे कमाल तापमान सरासरी एवढे नोंदविले आहे़. मराठवाड्यातील तापमानात काहीशी वाढ झाली आहे़. विदर्भातील काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे़. 
देशभरात आसाम, मेघालय, दक्षिण तामिळनाडु आणि केरळला जोरदार पाऊस होत आहे तसेच पश्चिम बंगाल, ओडिशा येथे तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे़. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, बिहार, आंध्र प्रदेशचा किनारी प्रदेश, कर्नाटकची किनारपट्टी या भागात मेघगर्जनेसह पाऊस होत असून येत्या २४ तासात या परिसरात पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. पुण्यात कमाल व किमान तापमानात घट झाली असून आता ते सरासरी एवढे नोंदविले जात आहे़. बुधवारी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे़. 
विदर्भात बुधवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता असून गुरुवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़. १८ व १९ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. 

Web Title: heavy rainfall in Vidharbha, possibility of rain everywhere in the state on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.