वीजांच्या कटकडाटात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 15:19 IST2017-09-29T15:04:21+5:302017-09-29T15:19:25+5:30

जोरात वारे वाहून वादळ निर्माण होत वीजांचा कडकडाटात शहराच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र त्रेधा उडाली.

Heavy rain in power cuts | वीजांच्या कटकडाटात मुसळधार पाऊस

वीजांच्या कटकडाटात मुसळधार पाऊस

ठळक मुद्देसकाळी सर्वत्रच ऊन आणि उकाडा जाणवत होता.या एका दिवसात नागरिकांना उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीन ऋतूंचे दर्शन होऊन वेगळा अनुभव मिळत आहे.

पुणे : सकाळपासूनच कडक ऊन ...सर्वत्र उकाडा.. आणि दुपारी दीडच्या सुमारास अचानक जोरात वारे वाहून वादळ निर्माण होत वीजांचा कडकडाटात शहराच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र त्रेधा उडाली. कारण सकाळी सर्वत्रच ऊन आणि उकाडा जाणवत होता. दुचाकीस्वारांनी झाडांचा आश्रय घेतल्याचे दिसत होते. 
या एका दिवसात नागरिकांना उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीन ऋतूंचे दर्शन होऊन वेगळा अनुभव मिळत आहे. या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार झाले असून आधीच उकाडा त्यात वीज नसल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. 

Web Title: Heavy rain in power cuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे