शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पावसाने आमचे लाखोंचे नुकसान; महापालिकेच्या चुकीची शिक्षा आम्हाला का? दुकानदारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 11:55 IST

एक कोटीहून अधिक रुपयांचे नाला सफाईचे टेंडर मिळालेल्या ठेकेदाराने नक्की काय काम केले? दुकानदारांचा सवाल

धायरी: चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबाग येथील २२ दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याठिकाणी महापालिकेचे अधिकारी, विद्यमान आमदार, खासदार यांनी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी देखील केली. मात्र महापालिकेच्या चुकीमुळे आम्हा दुकानदारांचे झालेले नुकसान कोण भरून देणार, हा सवाल येथील व्यावसायिक करीत आहेत.

सिंहगड रस्ता परिसरातील फनटाईम थिएटरपासून ते माणिकबागपर्यंत मुख्य रस्त्यावरून येणारे पावसाचे पाणी हे ब्रह्मा हॉटेलसमोरील उतारावर असलेल्या लेनमध्ये शिरते. त्याचबरोबर परिसरातील चेंबर व्यवस्थित साफ न केल्याने हा प्रकार घडल्याचे व्यावसायिकांची म्हणणे आहे. आनंदनगर चौक, माणिकबाग, विश्रांतीनगर आदी ठिकाणी रस्त्यावर पाण्याचे तळे साचल्याने वाहतुकीची गंभीर स्थिती निर्माण झाली. चेंबर व्यवस्थित साफ न केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे येथील व्यवसायिकांची म्हणणे आहे. तसेच धायरी येथील सावित्री गार्डन नाला, रायकर मळा नाला, अभिरुची नाला, माणिकबाग नाला, वडगाव -आंबेगाव हद्दीवरीवल धबाडी नाला, वडगाव बुद्रुक नाला आदी ओढे व नाल्यांचे पाणी सोसायट्या, लोकवस्त्यांत, तसेच मुख्य रस्त्यावर येत असल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या संकटाना तोंड द्यावे लागत आहे. सिंहगड रस्त्यासह त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साठत आहेत.

एक कोटीहून अधिक रुपयांचे टेंडर; तरीही पावसाचे पाणी रस्त्यावर...

सिंहगड रस्ता परिसरातील नाला सफाई कितपत केली याबद्दल नागरिकांच्या मनात साशंकता आहे. नागरिकांच्या कररुपी पैशांची नुसती उधळपट्टी सुरू असून एक कोटीहून अधिक रुपयांचे नाला सफाईचे टेंडर मिळालेल्या ठेकेदाराने नक्की काय काम केले, हा खरा प्रश्न आहे. या ठेकेदारसोबत कोण कोण अधिकारी सामील आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

नालेसफाईचे काम पूर्ण केले म्हणणाऱ्या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे करणार आहे. - प्रसन्न जगताप, माजी उपमहापौर आमच्या लेनमध्ये २२ व्यावसायिकांची दुकाने आहेत. सर्व दुकानांत किमान चार फूट पाणी होते. माझा टेलरिंग व्यवसाय असल्याने ग्राहकांचे नवीन कपडे, इन्व्हर्टर, फर्निचर आदी वस्तू सर्व खराब झाल्या. महापालिकेच्या एका चुकीमुळे आम्हा व्यवसायिकांचे विनाकारण आर्थिक नुकसान झाले याची भरपाई कोण देणार? - उत्तम दबडे, टेलर व्यावसायिक, माणिकबाग

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाRainपाऊसWaterपाणीenvironmentपर्यावरण