शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

LonavalA Rain: लोणावळा शहरात मुसळधार पाऊस; 24 तासात 232 मिमी पावसाची नोंद, रस्ते जलमय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 14:05 IST

रस्ते जलमय झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने यामध्ये देखील पाणी घुसून व्यवसायिकांचे नुकसान

लोणावळा : लोणावळा शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी (3 ऑगस्ट) रोजी 24 तासात लोणावळा शहरात 232 मिमी (9.13 इंच) पावसाची नोंद झाली. आज देखील सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. सकाळी 5 तासात लोणावळ्यात 150 मिमी पाऊस झाला. दुपार पासून पावसाने काहीशी उघडीत घेतली आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर जमा झालेले पाणी हे आता कमी होऊ लागले आहे.       हवामान विभागाने पुणे घाट माथ्यावर दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. लोणावळा शहर व ग्रामीण भागात सर्वत्र कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. लोणावळा शहरात यावर्षी आज अखेरपर्यंत 4047 मिमी (159.33 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी लोणावळा शहरात जास्त पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून अतिशय वेगाने पाणी वाहू लागल्याने धरणाकडे जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. कार्ला, मळवली, देवले, वाकसई चाळ, सदापूर या भागामध्ये इंद्रायणी नदीच्या पुराचे पाणी पसरले आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात भराव करत काही नवीन हॉटेल्स तयार करण्यात आले आहेत त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून हॉटेलच्या पायऱ्यांपर्यंत पाणी गेल्याचे चित्र पाहायला मिळत होते. आई एकवीरा देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता तसेच पाच पायरी मंदिराच्या पुढे डोंगरावरून वाहणारा धबधबा वेगाने वाद असल्याने पायऱ्यांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.      लोणावळा शहरातील शहाणी रोड, नारायणी धाम मंदिरासमोरील रस्ता, नांगरगाव रस्ता, बापदेव रोड यासह बद्री विशाल सोसायटी, पांगारे चाळ, निसर्ग नगरी, लोणावळा बस स्थानकाचा परिसर, खंडाळा रोहिदास वाडा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक घरांमध्ये पाणी घुसले. तर रस्ते जलमय झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने यामध्ये देखील पाणी घुसून व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असल्याने रस्त्यांवर साचलेले पाणी हे वाहून जाऊ लागले आहे.

टॅग्स :PuneपुणेlonavalaलोणावळाRainपाऊसWaterपाणीDamधरणNatureनिसर्गenvironmentपर्यावरण