लोणावळ्यात ढगांचा गडगडाटासह जोरदार सरी! चार तासात तब्बल १०६ मिमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 17:56 IST2024-06-12T17:55:08+5:302024-06-12T17:56:30+5:30

या चार तासात लोणावळा शहरात तब्बल १०६ मिलिमीटर (४.१७ इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे....

Heavy rain in Lonavala! As much as 106 mm of rain was recorded in four hours; Water on the road | लोणावळ्यात ढगांचा गडगडाटासह जोरदार सरी! चार तासात तब्बल १०६ मिमी पावसाची नोंद

लोणावळ्यात ढगांचा गडगडाटासह जोरदार सरी! चार तासात तब्बल १०६ मिमी पावसाची नोंद

लोणावळा (पुणे) :लोणावळा शहरामध्ये मंगळवारी जोरदार पाऊस झाला. ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट करत जोरदार पाऊस रात्री नऊ वाजेपर्यंत झाला. या चार तासात लोणावळा शहरात तब्बल १०६ मिलिमीटर (४.१७ इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. लोणावळा शहरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावत आपल्या आगमनाची चाहूल दिली. काल झालेल्या जोरदार पावसामुळे लोणावळा शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या. प्रशासनाने याची दखल घेत तत्काळ त्या त्या भागातील समस्या सोडवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

लोणावळा शहरामध्ये यावर्षी आतापर्यंत २८३ मिलिमीटर (११. १४ इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मान्सून घाटमाथ्यावर लवकर सक्रिय झाला आहे. पावसाच्या आगमनामुळे उष्णतेने व उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Heavy rain in Lonavala! As much as 106 mm of rain was recorded in four hours; Water on the road