शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
2
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
3
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
4
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
5
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
6
विवाहित महिला पुतण्याच्या प्रेमात पडली, लिव्ह-इनमध्ये राहिली; वाद सुरू होताच आयुष्य संपवलं! आता पती म्हणाला...
7
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
8
Manifestation Tips: पैसा, मनःशांती, समाधान, जे हवं ते सगळं मिळेल; फक्त रोज करा 'हे' तीन उपाय
9
परेश रावल यांनी 'दृश्यम ३'ला दिला नकार; कारण सांगत म्हणाले, "स्क्रिप्ट खूप चांगली आहे पण..."
10
LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स
11
थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज
12
Marriage Astro Tips: लग्न ठरवताना घाई केली, तर भविष्यात हर्षल नेपच्युन देऊ शकतो धोका!
13
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
14
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
15
"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना
16
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
17
"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!
18
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
19
'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
20
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 

Video: जेजुरीत मुसळधार; पायऱ्यांवरून वाहू लागले धबधब्यासारखे पाणी, भाविकांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:39 IST

जेजुरी गडाच्या पायरी मार्गावरून धो धो पाणी वाहत असल्याने भाविकांची मोठी तारांबळ उडाली होती, तर अनेकांच्या घरातही पाणी शिरले

जेजुरी : जेजुरी पंचक्रोशी मध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग नागरिकांनी अनुभवली. ऐन उन्हाळ्याच्या मे महिन्याच्या उत्तरार्धात सुरू झालेला पाऊस क्रित्येक वर्षांनी नागरिकांनी अनुभवला. जेजुरी परिसरात सुमारे २१७मिलिमीटर पावसाची नोंद रविवारी (दि.२५) सायंकाळपर्यंत झाली होती.

 सोमवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास पावसाने उसंत घेतली होती सूर्यदर्शन झाले होते. मात्र हे वातावरण काही काळ टिकले, त्यानंतर दुपारी १ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. सलग अर्धा ते पाऊणतास झालेल्या पावसाने नाले व बंधारे भरले आहेत. जेजुरी गडाच्या पायरीमार्गावरून धो धो पाणी वाहत असल्याने भाविकांची मोठी तारांबळ उडाली होती. तर अनेकांच्या घरात ही पाणी शिरले. मोरगाव रस्त्यालगतच्या घरातून पाणी घुसल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. नगरपालिकेने ताबडतोप उपाययोजना कराव्यात अशी स्थानिकांनी मागणी केली आहे. 

राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

रविवारी मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे. यंदा नैर्ऋत्य मोसमी वारे १३ मे रोजीच अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांत मान्सून शनिवारी (दि. २४ मे) वेगाने केरळ व कर्नाटकात दाखल झाला. त्यानंतर वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करून रविवारी मान्सून गोव्यासह कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल झाला आहे. राज्यात मान्सून साधारणपणे ७ जूनच्या दरम्यान दाखल होतो. परंतु यंदा २५ मे रोजीच सुमारे १२ ते १४ दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनने रविवारी संपूर्ण गोवा आणि देवगडपर्यंत भाग व्यापला. देवगड, बेळगावी, हावेरी, धर्मपुरी, चेन्नई आणि कोहिमा मार्गे मान्सून जात आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या मराठवाड्याच्या भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत कोकण, गोव्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरीRainपाऊसweatherहवामान अंदाजWaterपाणीDamधरणNatureनिसर्ग