शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुन्हा अवकाळीचे संकट; मराठवाडा, विदर्भात ४ दिवस पावसाबरोबरच गारपीटचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 19:39 IST

विदर्भात ९ जानेवारी रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे

पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मध्य भारताच्या दिशेने आर्द्रतायुक्त वार्‍यांचा संगम होत आहे. पुढील ३ ते ४ दिवस मध्य भारतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टरबन्सच्या प्रभावामुळे उत्तर भारतात पुढील ४८ तासात पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता असून मध्य भारतात ९ ते १२ जानेवारी दरम्यान गडगडाटीसह पावसाची शक्यता आहे.

राज्यात शनिवारी अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. त्यामुळे विदर्भात बर्‍याच ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १२.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. 

अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरुन आर्द्रतायुक्त वारे मध्य भारतापर्यंत येत आहे. हे दोन्हीकडील वारे एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यातून राज्यात गडगडाटासह पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये ९ व १० जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व गारा पडण्याची शक्यता आहे. लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

विदर्भात ९ जानेवारी रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १० ते १२ जानेवारी दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे शहर व परिसरात पुढील ३ दिवस आकाश दुपारनंतर अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसHailstormगारपीटMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भ