शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

तुफान पावसाने पुणे तुंबले ; एक जण वाहून गेला, १५ ते २० चारचाकी वाहत गेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 00:56 IST

पुण्यात पावसाचा जाेर अद्याप असून अनेक ठिकाणी सहा फुटांपर्यंत पाणी साचले आहे.

पुणे : पुणे शहरात बुधवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून तुफान पावसामुळे अक्षरश: नागरिकांची दैना उडाली. कात्रज, बिबवेवाडी, सहकारनगर, बाणेर, औंध, शिवाजीनगर, येरवडा, मध्य पुण्यात पेठांमध्ये अक्षरश: ढगफुटी झाल्याने नागरिकांनी सांगितले. कात्रज, कोंढवा, बिबवेवाडी परिसरातील रस्त्यावर डोक्याएवढे पाणी वाहत होते. या पाण्यातून दुचाकीबरोबर चारचाकी वाहने वाहत असल्याची माहिती नागरिकांनी ‘लोकमत’ला फोनकरून कळविले आहे. तर कात्रज, बिबवेवाडी पाण्यात अडकलेल्या नागरिकांना मदत पोहचवा, अशी विनंती अग्निशमन विभागाला कळविली. अडकलेल्या नागरिकांना मदत पोहचन नसल्याने नागरिक हवालदिवाल झाले होते.

खडकवासला धरणातून ९४१६ क्युसेकने सोडले पाणीखडकवासला धरणातून मध्यरात्री १ वाजता ९४१६ क्युसेकनने पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या इशारा दिला. पहाटे हा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असल्याची देखील अधिकाºयांनी सांगितले.

शहरातील वीज गायबपुण्यात सायंकाळपासून तुफान पावसाने हजेरी लावल्याने प्रचंड हाहाकार उडाला होता. त्यातच शहरातील वीज गायब झाल्याने वाहनचालकांना रस्त्यातून मार्ग काढणे अवघड बनले होते. त्यातच सोशल मीडियावर, व्हॉटसअपवर अफवा पसरल्याने ही परिस्थिती आणखीच बिकट बनली होती.

मध्यवस्तीतील पेठांमध्ये पाणी साचले मध्यवस्तीतीतल पेठ्यामध्ये देखील जागोजाी पाणी साचल्याने होते. तर काही सोसायट्यांमध्या पाणी शिरले होते. पाणी जाण्याकरीता मार्ग नसल्याने पेठातील रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले होते.

दांडेकर पूल झोपडपट्टीत शिरले पाणी दांडेकर पूल परिसरातील सर्वच रस्त्यावर पाणी साचल्याने शेजारच्या झोपडपट्टीत पाणी शिरले. हनुमाननगर, दत्तवाडीतील नागरिकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरले. तीन ते चार फुटांपर्यंत पाणी आल्याने येथील ४० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. स्थानिक कार्यकर्ते मदत करत होते. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने राष्ट्रसेवा दलाच्या निळू फुले कला मंदिरात त्यांना हलविण्यात आले होते.

वारजे पुलाखाली पाणीच पाणीवारजे पुलाखाली प्रंचड पाणी आल्याने याठिकाणी प्रंचड वाहतूककांडी झाली. त्यामुळे वारजे ते कोथरूड रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला होता. पीएमपी बस बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गाड्या बंद पडल्याने वारजे पूल ते गणपती माथा परिसरात तीन ते साडेतीन  किलोमिटरच्या रांगा लागल्या होत्या. प्रवाशी नागरिक प्रचंड भयभीत झाल्याने याठिकाणी अनेक तरूण नागरिकांच्या मदतीसाठी धावले.

बिबवेवाडी-सातारा रस्ता सातारा रस्त्यावर प्रंचड पाणी आल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. सातारा रस्त्याला मिळणारे बिबवेवाडीतील सर्व रस्ते जाम झाले होते. कारण ओंढ्यावरील सर्व पूल पाण्याखाली गेल्याने मुख्य रस्त्यावर पाणी आले होते. बिबवेवाडी पुनम गार्डन सोसायटी मध्ये पाणी शिरले आहे. याठिकाणी तात्काळ मदतीची आवश्यकता असून प्रशासनाचे सर्व संपर्क क्रमांक व्यस्त लागत आहेत.

मित्रमंडळ कॉलनी चारी बाजूने पाणी साठले होते. लोकांना बाहेर येता येत नव्हते. तर दुसºया बाजूला आंबिल ओढा ओसंडून वाहत होता. सहकार, तळजाईला जाणार रस्ता तेथील नाला फुटल्यामुळे ब्लॉक झाला आहे. गजानन महाराज मठ ते पुढपर्यंत भरपूर पाणी साचले असून गाड्या वाहून जात असल्याचे नागरिकांनी कळविले. तर कोल्हेवाडी परिसरात देखील दुसºया मजल्यापर्यंत पाणी आल्याचे देखील सांगितले.

बाणेर बाणेर रस्त्यावर सिंध सोसायटीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दोन फूट पाण्यातून चारचाकी गाड्याही जाताना बंद पडत आहे. या मार्गाचा वापर न करता दुचाकी चालकांनी पर्यायी मार्ग वापरावा यासाठी सकाळनगर आणि बाणेर फाटा येथे काही नागरिक  सूचना देत होते.

धनकवडीमध्ये जनजीवन विस्कळीत धनकवडी मध्ये सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक घरात पाणी शिरले. ओढे नाले तुंबळ भरल्याने सर्व पाणी रस्त्यावर तर बरेच पाणी नागरिकांच्या घरात गेले. जानूबाई मार्ग राऊत बाग येथील पुलावरून पाणी जात असल्याने बंद केला आहे. बालाजीनगर परिसरात बीआरटी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून पद्मावती येथील गुरुराज सोसायटी नाल्या जवळील कंपाउंडची भिंत कोसळली आहे. तळ मजला पुर्ण पाण्याखाली गेला आहे. काही ठिकाणी दुचाकी व रिक्षा वाहून गेले आहेत. जागोजागी पाणी भरले आहे.  कात्रज चौक, दत्तनगर भुयारी मार्गात चार फूट पाणी भरले असून मार्ग बंद आहे. बरेच ठिकाणी प्रवाशी रस्त्यावर अडकले आहेत. रात्री साडे आठ पासून सुरू असलेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. बालाजीनगर येथील रजनी कॉर्नर परिसरात सामाजिक कार्यकर्ते दिगंबर डवरी यांनी नागरिकांच्या घरात पाणी गेलेल्या दहा पंथरा नागरिकांना स्वत: घरी असरा दिला.

सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा पुणे शहर व परिसरात जनजीनव विस्कळीत झाले. आम्ही महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. याचबरोबर कोणालाही कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास थेट माझाशी संपर्क करा.- मुक्ता टिळक, महापौर 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसfloodपूर