शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Temperature: महाराष्ट्रात उकाडा वाढला, तापमानाचा पारा चाळीशी पार, विदर्भात उष्णतेची लाट

By नितीन चौधरी | Updated: March 12, 2025 20:28 IST

राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४१.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या वर

पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात विदर्भात उष्णतेची लाट आली असून बहुतांश जिल्ह्यांच्या मुख्यालयाचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर पोचले आहे. राज्यात बुधवारी (दि. १२) सर्वाधिक ४१.४ अंश सेल्सिअस तापमानअकोला येथे नोंदविण्यात आले. पुण्यातही तापमानाने चाळिशी ओलांडली असून लोहगाव तसेच कोरेगाव पार्क येथे ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उष्णतेच्या लाटेमुळे सरासरी कमाल तापमान तीन ते सहा अंशांनी वाढले असून किमान तापमानातही दोन ते चार अंशांची वाढ दिसून येत आहे. राज्यात सर्वात कमी तापमान अहिल्यानगर येथे १६.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

राज्यात सर्वत्र कोरडे हवामान असल्यामुळे तसेच उत्तरेतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी विदर्भातील तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पारा ४० अंशांच्या वर पोचले आहे. राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४१.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या वर पोचले आहे. मध्य महाराष्ट्रात पुण्यात ४० अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदविण्यात आले. तर जळगाव, सोलापूर या ठिकाणी पारा ४० अंशांच्या जवळ पोचला आहे. कमाल सरासरी तापमानात तीन ते सहा अंशांची वाढ झाल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. किमान तापमानातही सरासरीपेक्षा दोन ते चार अंशाने वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. त्यामुळे एसी, कुलर व फॅन लावावे लागत आहेत. परिणामी राज्यात विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार चंद्रपूर व अकोल्यात गुरुवारी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील बुधवारी विविध शहरात नोंदविण्यात आलेले कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअस)

पुणे ३८.२लोहगाव ४०.२जळगाव ३९.४कोल्हापूर ३६.५महाबळेश्वर ३२.१नाशिक ३८.७सांगली ३८.१सातारा ३७.९सोलापूर ३९.४मुंबई ३७सांताक्रुज ३८.६रत्नागिरी ३८.४डहाणू ३४.८संभाजीनगर ३८.२परभणी ३९.१अकोला ४१.३अमरावती ३९.८बुलढाणा ३८.२ब्रह्मपुरी ४०.४चंद्रपूर ४०.६गोंदिया ३८.२नागपूर ४०.२वाशिम ३९.८वर्धा ४०यवतमाळ ४०

पुण्यातील तापमान

शिवाजीनगर ३८.२पाषाण ३८.२लोहगाव ४०.२चिंचवड ३९.१लवळे ३७.९मगरपट्टा ३८.३कोरेगाव पार्क ४०.२एनडीए ३७.५

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रTemperatureतापमानVidarbhaविदर्भAkolaअकोलाHealthआरोग्यenvironmentपर्यावरणNatureनिसर्ग