शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

आता बोला..! केंद्र सरकारच्या 'इंजेक्शन'वर पुणे महापालिकेची आरोग्य व्यवस्था 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 11:53 IST

खाजगी रूग्णालयांची तिजोरी भरण्याचे पालिकेचे काम 

ठळक मुद्देएनयुएचएम’ च्या वैद्यकीय सेवकांकडून आरोग्य विभागाला आधार ३६४ सेवक पालिकेच्या रूग्णालयांमध्ये कार्यरत 

नीलेश राऊत-पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला ‘एनयुएचएम’ च्या वैद्यकीय सेवकांनी बळ दिले असून, शासनाकडून ‘राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान’ (एन.यु़एच.एम.) व प्रजनन व बाल आरोग्य (आर.सीएच.) या योजनांसाठीचा नियुक्त केलेले ३६४ आरोग्य सेवक आजमितीला महापालिकेच्या १९ प्रसुतीगृहे व ७० हून अधिक छोट्या मोठ्या दवाखान्यासह आरोग्य विभागांच्या विविध कार्यालयांमध्येच सेवा बजावत आहेत.

वर्ग एकच्या १५१ मान्य पदांपैकी केवळ ७ पदांवर नियुक्ती असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाला,केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्यदायी योजनांसाठीचा ३६४ जणांचा सेवक वर्ग संबंधित कामांसाठी नियुक्त करण्यात आला आहे. पण हे सर्व आरोग्य सेवक कोरोना आपत्तीत अग्रभागी राहून इतर वेळीही आपली सेवा महापालिकेच्या विविध रूग्णालयांमध्ये व कार्यालयांत बजावत आहेत.

कोरोना आपत्तीत सर्व यंत्रणांनी हातात-हात घालून काम केले.या काळात एनयुएचएम चा सेवक वर्गही अग्रभागी राहिला. परंतु, या आपत्तीच्या अगोदर व आता लसीकरण मोहिमेनंतर तरी महापालिका आपली आरोग्य यंत्रणा सक्षम करणार आहे की नाही असा प्रश्न शहरातील सामाजिक संघटनांनी उपस्थित केला आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकरिता शासन मान्यतेनुसार वैद्यकीय अधिक्षकपासून, न्यरोसर्जन, कार्डिओलॉजिस्ट ते फिजिशियनपर्यंतची १५१ पदे मंजूर आहेत़ पण आजमितीला यापैकी केवळ ७ जागांवरच नियुक्ती झाली असून, उर्वरित १४४ जागा रिक्त आहेत़ तर वर्ग दोनची ७८, वर्ग तीनची २३८ व वर्ग ४ ची २७३ पदे रिक्त आहेत. ------------------------खाजगी रूग्णालयांची तिजोरी भरण्याचे पालिकेचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील वैद्यकीय सेवक शहराची आरोग्य यंत्रणा चालविण्यासाठी वापरण्यात येत आहे. शेकडो कोटी रूपयांची आर्थिक तरतूद असलेल्या आपल्या आरोग्य विभागाला सक्षम करण्यापेक्षा शहरी गरीब योजनेसारख्या योजना राबवून खाजगी रूग्णालयांची तिजोरी भरण्याचे काम महापालिका सध्या करीत आहे.विवेक वेलणकर, अध्यक्ष सजग नागरिक मंच-------------------------

कोरोना आपत्तीत ‘एनयुएचएम’ चा वैद्यकीय सेवक वर्ग स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरोग्य यंत्रणेबरोबर दिवसरात्र कार्यरत होता. मात्र या आपत्तीनंतर व पूर्वीही ज्या ठिकाणी हा सेवक वर्ग मूळ कामाव्यतिरिक्त वापरला जात होता.त्या सर्व महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांना ‘एनयुएचएम’ चा वैद्यकीय सेवक वर्ग मूळ कामी रूजू करण्याबाबतचे पत्र देण्यात येणार आहे. तसेच याबाबतचा अहवालही मागविला जाणार असल्याची माहिती    ‘एनयुएचएम’राज्य मुख्यालयाकडून देण्यात आली आहे.-------------------------कोरोना आपत्तीत आरोग्य विभागासह महापालिकेच्या इतर सर्व विभागांनी एकत्रित काम केले. यात ‘एनयुएचएम’ चा वैद्यकीय सेवक वर्गही कार्यरत होता़ महापालिकेच्या आरोग्य विभागात‘एनयुएचएम’चा  सेवक वर्ग त्यांना दिलेल्या जबाबदारीवरच कार्यरत असतो. दरम्यान, आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच महापालिकेतील सर्व जागा भरल्या जातील. डॉ़आशिष भारती़ आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका़ -------------------------------- 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलCentral Governmentकेंद्र सरकार