शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पुणे पालिकेकडे अडीच कोटींची बिले थकल्याने थांबविली आरोग्य सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 12:59 PM

ठेकेदार व पालिकेच्या या सावळ्या गोंधळात हजारो रुग्णांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देरुग्णांचे हाल : दहा दिवसांपासून पालिकेच्या रुग्णालयांमधील लॅब कलेक्शन केले बंदमहापालिकेचे शहरात छोटे-मोठे असे एकूण ७० दवाखाने आणि १४ प्रसूतिगृहे

लक्ष्मण मोरे -  पुणे : महानगरपालिकेला पॅथॉलॉजी, डायग्नोसिस आणि रेडिओलॉजीची (एक्स-रे) सेवा पुरविणाऱ्या ठेकेदाराने ३० ऑगस्टपासून सेवा देणे बंद केले आहे. पालिकेच्या गलथान कारभाराचा फटका रुग्णांना सहन करावा लागत असून ठेकेदाराने त्याची पालिकेकडे  अडीच कोटींची थकबाकी असल्याचा दावा केला आहे. ठेकेदार व पालिकेच्या या सर्व गोंधळात हजारो रुग्णांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.महापालिकेचे शहरात छोटे-मोठे असे एकूण ७० दवाखाने आणि १४ प्रसूतिगृहे आहेत. या दवाखान्यांमध्ये रुग्णांची रक्त, लघवी आदी नमुने घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आरोग्य विभाग, लेखापरीक्षण विभाग व ठेकेदार यांच्या समन्वयाअभावी हजारो रुग्णांचे हाल होत आहेत. सर्व दवाखान्यांमधील रक्त, लघवीचे नमुने घेण्याची व एक्स-रे काढण्याची सेवा ठप्प झाल्याने नाईलाजास्तव नागरिकांना खासगी रुग्णालयांमधून या तपासण्या करून घ्याव्या लागत आहेत. पालिकेच्या दवाखान्यांमध्ये शहरी गरीब योजना, अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचे लाभार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या या तपासण्या मोफत केल्या जातात. परंतु, ३० ऑगस्टपासून ही सेवा बंद असल्याने हजारो रुग्णांना खासगी लॅबमध्ये पैसे खर्च करावे लागत आहेत.कृष्णा डायग्नोसिस सर्व्हिसेस यांना पॅथॉलॉजी, डायग्नोसिस आणि रेडिओलॉजी सेवा पुरविण्याचे कंत्राट दिलेले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू व्हायला सहा महिन्यांचा कालावधी गेला. तेव्हापासून कृष्णा डायग्नोसिस सर्व्हिसेसकडून सेवा दिली जात आहे. पालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालये व प्रसूतिगृहांमधून थुंकी आणि एचआयव्ही वगळता अन्य सर्व प्रकारचे नमुने घेतले जातात. पालिकेने त्यांच्यासोबत करार केलेला आहे. पालिकेने ठेकेदाराला सर्व दवाखान्यांमध्ये आवश्यकतेनुसार पॅथॉलॉजी लॅबसाठी जागाही उपलब्ध करून दिलेली असून त्यांना पालिकेकडून सेवेपोटी पैसेही देतात. या सेवा रुग्णांना मोफत देणे अपेक्षित आहे.परंतु, तब्बल अडीच कोटींची बिले थकल्याचा दावा ठेकेदाराने केला आहे. कोट्यवधींची थकबाकी असून बिले वेळेत मिळत नसल्याने मोफत सेवा बंद करण्यात येत असल्याची नोटीस पालिकेला दिली होती. ही नोटीस मिळताच पालिकेच्या आरोग्य विभागानेही ठेकेदाराला नोटीस बजावत सेवा बंद न करण्याविषयी कळविले. परंतु, पालिकेला नोटीस बजावल्यानंतर तत्काळ सेवा खंडित केली. वास्तविक करारामध्ये एक महिन्याआधी नोटीस देण्याची अट ठेकेदाराकडून पाळली गेली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता आरोग्य विभागाकडे बिले थकीत नसून लेखापरीक्षण विभागाकडे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर