शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये डोकेदुखी ठरताहेत 'रिकामटेकडे हॅकर्स'; नागरिकांनो, ओटीपी, पासवर्ड शेयर करू नका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 15:37 IST

सध्या ऑनलाइन वस्तूंची खरेदी विक्री, तसेच सतत मेसेज करून त्यातील बनावट लिंकच्या आधारे नागरिकांचे बँक डिटेल्स मिळवण्याचे काम 'हॅकर्स' करत आहेत. ..

ठळक मुद्देशहरात सुरू असणाऱ्या सायबर गुन्ह्याकडे सायबर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून फेक लिंक टाकून होतेय फसवणूक :दारूच्या दुकानाच्या नावाने फेक वेबसाईट 

पुणे : काही करून समोरच्याला आपल्या जाळ्यात अडकवणे यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या कल्पना लढवतात. तंत्रज्ञानात सर्वसामान्य नागरिकांपेक्षा दहा पावले पूढे असणारे हॅकर्स नागरिकांना गंडवण्यातही माहिर असतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून 'रिकामटेकडे हॅकर्स'अधिक 'अ‍ॅक्टिव्ह' झाल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. सध्या तर एखादी इन्शुरन्स कंपनी, बँक, फूड सप्लायर कंपनी, ऑनलाइन गेम्स च्या नावाने फेक मेसेज लिंक करून फसवणूक केली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरात सुरू असणाऱ्या सायबर गुन्ह्याकडे सायबर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. यापूर्वी देखील विभागाच्या वतीने नागरिकांना व्हाट्सअप, आणि पर्सनल मेसेजद्वारे येणाऱ्या कुठल्याही लिंकला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी व्हाट्सअप अकाऊंट हॅक करण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. परंतु प्रशासनाने वेळीच या घटनेची दखल घेऊन तातडीने सोशल माध्यमातून नागरिकांना आपले व्हाट्स अप अकाउंट हॅक होऊ नये यासाठी कुठली काळजी घ्यावी याविषयी सूचना देण्यात आल्या. सध्या ऑनलाइन वस्तूंची खरेदी विक्री, तसेच सतत मेसेज करून त्यातील बनावट लिंक च्या आधारे नागरिकांचे बँक डिटेल्स मिळवण्याचे काम 'हॅकर्स' करत आहेत.याविषयी अधिक माहिती देताना सायबर तज्ञ अ‍ॅड. गौरव जाचक म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियातून येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा आणि त्यामुळे फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक आहेत. या काळात हॅकर्स मोठ्या संख्येने अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. नागरिक मात्र काळजी घेत नाहीत. आपल्याला बँकेच्या अथवा एखादया कंपनीच्या नावाने आलेली लिंक ते तपासून घेत नाहीत. त्यावर क्लिक करून फसवणूक करून घेतात. गुगल वर संबंधीत लिंक खरी अथवा खोटी हे तपासता येणं शक्य आहे. त्याचा उपयोग करावा. 

* दारूच्या दुकानाच्या नावाने फेक वेबसाईट वाईन शॉप बंद आहे तर ऑनलाइन दारू मिळेल असे फेक मेसेज सुरुवातीला लोकांना येऊ लागले. यामुळे अनेकांना फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. इतकेच नव्हे तर त्या त्या भागातील दुकानाच्या नावाने लिंक ग्राहकांना पाठवण्यात आली. दारूच्या दुकानांचे फेक पोर्टल्स तयार केल्याचे दिसून आले. हे काम हॅकर्सचे होते. अशा पद्धतीने ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे ?ड. जाचक यांनी सांगितले. 

 फेक मेसेजद्वारे नागरिकांना फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. मात्र यात नागरिकांनी काळजी घ्यावी. ज्या कंपनीच्या नावाने मेसेज आहे त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्याची खात्री करून घ्यावी. दारूच्या दुकानाच्या नावाने काही फेक मेसेज व्हाट्सपच्या माध्यमातून व्हायरल झाले होते.त्यावर प्रशासनाकडून तातडीने नोटिफिकेशन काढण्यात आले. त्यात अशाप्रकारच्या मेसेजला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र त्याबाबत तक्रारी अद्याप दाखल झालेल्या नाहीत. कुठल्याही परिस्थितीत आपला बँक पासवर्ड आणि ओटीपी शेयर न करणे ही गोष्ट नागरिकांनी लक्षात ठेवावी. - संभाजी कदम (पोलीस उपायुक्त, आर्थिक व सायबर शाखा)

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम