लॉकडाऊनमध्ये डोकेदुखी ठरताहेत 'रिकामटेकडे हॅकर्स'; नागरिकांनो, ओटीपी, पासवर्ड शेयर करू नका 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 03:34 PM2020-05-06T15:34:41+5:302020-05-06T15:37:00+5:30

सध्या ऑनलाइन वस्तूंची खरेदी विक्री, तसेच सतत मेसेज करून त्यातील बनावट लिंकच्या आधारे नागरिकांचे बँक डिटेल्स मिळवण्याचे काम 'हॅकर्स' करत आहेत. ..

Headache of hackers in lockdown period ; Citizens, OTP, do not share passwords | लॉकडाऊनमध्ये डोकेदुखी ठरताहेत 'रिकामटेकडे हॅकर्स'; नागरिकांनो, ओटीपी, पासवर्ड शेयर करू नका 

लॉकडाऊनमध्ये डोकेदुखी ठरताहेत 'रिकामटेकडे हॅकर्स'; नागरिकांनो, ओटीपी, पासवर्ड शेयर करू नका 

Next
ठळक मुद्देशहरात सुरू असणाऱ्या सायबर गुन्ह्याकडे सायबर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून फेक लिंक टाकून होतेय फसवणूक :दारूच्या दुकानाच्या नावाने फेक वेबसाईट 

पुणे : काही करून समोरच्याला आपल्या जाळ्यात अडकवणे यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या कल्पना लढवतात. तंत्रज्ञानात सर्वसामान्य नागरिकांपेक्षा दहा पावले पूढे असणारे हॅकर्स नागरिकांना गंडवण्यातही माहिर असतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून 'रिकामटेकडे हॅकर्स'अधिक 'अ‍ॅक्टिव्ह' झाल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. सध्या तर एखादी इन्शुरन्स कंपनी, बँक, फूड सप्लायर कंपनी, ऑनलाइन गेम्स च्या नावाने फेक मेसेज लिंक करून फसवणूक केली जात आहे. 
लॉकडाऊनच्या काळात शहरात सुरू असणाऱ्या सायबर गुन्ह्याकडे सायबर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. यापूर्वी देखील विभागाच्या वतीने नागरिकांना व्हाट्सअप, आणि पर्सनल मेसेजद्वारे येणाऱ्या कुठल्याही लिंकला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी व्हाट्सअप अकाऊंट हॅक करण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. परंतु प्रशासनाने वेळीच या घटनेची दखल घेऊन तातडीने सोशल माध्यमातून नागरिकांना आपले व्हाट्स अप अकाउंट हॅक होऊ नये यासाठी कुठली काळजी घ्यावी याविषयी सूचना देण्यात आल्या. सध्या ऑनलाइन वस्तूंची खरेदी विक्री, तसेच सतत मेसेज करून त्यातील बनावट लिंक च्या आधारे नागरिकांचे बँक डिटेल्स मिळवण्याचे काम 'हॅकर्स' करत आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना सायबर तज्ञ अ‍ॅड. गौरव जाचक म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियातून येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा आणि त्यामुळे फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक आहेत. या काळात हॅकर्स मोठ्या संख्येने अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. नागरिक मात्र काळजी घेत नाहीत. आपल्याला बँकेच्या अथवा एखादया कंपनीच्या नावाने आलेली लिंक ते तपासून घेत नाहीत. त्यावर क्लिक करून फसवणूक करून घेतात. गुगल वर संबंधीत लिंक खरी अथवा खोटी हे तपासता येणं शक्य आहे. त्याचा उपयोग करावा. 

* दारूच्या दुकानाच्या नावाने फेक वेबसाईट 
वाईन शॉप बंद आहे तर ऑनलाइन दारू मिळेल असे फेक मेसेज सुरुवातीला लोकांना येऊ लागले. यामुळे अनेकांना फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. इतकेच नव्हे तर त्या त्या भागातील दुकानाच्या नावाने लिंक ग्राहकांना पाठवण्यात आली. दारूच्या दुकानांचे फेक पोर्टल्स तयार केल्याचे दिसून आले. हे काम हॅकर्सचे होते. अशा पद्धतीने ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे ?ड. जाचक यांनी सांगितले. 

 फेक मेसेजद्वारे नागरिकांना फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. मात्र यात नागरिकांनी काळजी घ्यावी. ज्या कंपनीच्या नावाने मेसेज आहे त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्याची खात्री करून घ्यावी. दारूच्या दुकानाच्या नावाने काही फेक मेसेज व्हाट्सपच्या माध्यमातून व्हायरल झाले होते.त्यावर प्रशासनाकडून तातडीने नोटिफिकेशन काढण्यात आले. त्यात अशाप्रकारच्या मेसेजला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र त्याबाबत तक्रारी अद्याप दाखल झालेल्या नाहीत. कुठल्याही परिस्थितीत आपला बँक पासवर्ड आणि ओटीपी शेयर न करणे ही गोष्ट नागरिकांनी लक्षात ठेवावी. 
- संभाजी कदम (पोलीस उपायुक्त, आर्थिक व सायबर शाखा)

Web Title: Headache of hackers in lockdown period ; Citizens, OTP, do not share passwords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.