पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने केले वार
By विवेक भुसे | Updated: September 11, 2022 18:27 IST2022-09-11T18:27:30+5:302022-09-11T18:27:39+5:30
पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने केले वार
पुणे: मिरवणुकीत नाचत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून एकाने कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लोहियानगर येथील रमेश बागवे यांच्या कार्यालयासमोरील चौकात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडला.
याप्रकरणी स्वप्निल साळुंके (वय २५, रा. लोहियानगर) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अंकुश विठ्ठल कांबळे (२२, रा. इनामके मळा, लोहियानगर) याला अटक केली आहे. स्वप्निल साळुंके हा श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचत होता. त्यावेळी अंकुश याच्याबरोबर स्वप्निल याची धक्काबुक्की झाली. तेव्हा अंकुश याने तुला संपवून टाकतो अशी धमकी देऊन कोयत्याने फिर्यादीच्या मानेवर, पायावर वार करून गंभीर जखमी केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक सूरज कुतवळ तपास करीत आहेत.