शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘तो’फक्त रिक्षाचालकांचेच चोरायचा ‘मोबाईल’; यामागचे ‘कारण’ ऐकून पोलीस देखील झाले ‘हैराण’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 20:19 IST

त्यानंतर सर्व रिक्षाचालक त्याच्या दृष्टीने गुन्हेगार ठरले...

पुणे : कॅम्प परिसरात मोबाईल चोरीच्या घटना वाढू लागल्या होत्या. त्यात प्रामुख्याने रिक्षाचालकांचेच मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण जास्तच होते. या चोराची पद्धत साधारण सारखी दिसत होती. सीसीटीव्हीचे फुटेज आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरुन, लष्कर पोलिसांनी एका तरुणाला पकडले़. त्याच्याकडे अनेक मोबाईल सापडले. रिक्षाचालकांचेच मोबाईल का चोरले असे विचारल्यावर त्याने दिलेले कारण ऐकून पोलीस देखील हैराण झाले. प्रेमभंगातून तो चोरटा बनला होता...

आसिफ उर्फ बोहरा अरिफभाई शेख (वय ३७, मुळ रा. अहमदाबाद) असे त्याचे नाव आहे. याबाबत लष्कर पोलिसांनी सांगितले की, आसिफ शेख हा सुमारे पावणे दोन वर्षांपूर्वी घरातील लोकांच्या विरोध पत्करुन एका तरुणीबरोबर लग्न करण्यासाठी पळून पुण्यात आला होता. मात्र, त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्या एका रिक्षाचालकावर प्रेम संबंध जुळले. आसिफचे २० ते २५ हजार रुपये घेऊन पुण्यात लग्नासाठी ते आले असताना ती एक दिवस संधी साधून रिक्षाचालकासोबत पळून गेली. त्याचा आसिफला मोठा धक्का बसला. त्यानंतर सर्व रिक्षाचालक त्याच्या दृष्टीने गुन्हेगार ठरले. त्यातूनच रिक्षाचालकांना त्रास देण्यासाठी तो त्यांचे मोबाईल चोरु लागला.................................................................

'अशी' होती त्यांची मोबाईल चोरीची स्टाईल आसिफ मोबाईल असलेल्या चालकाच्या रिक्षामध्ये बसत. एखादे गर्दीच्या ठिकाणी तो रिक्षा घेऊन जात असे. तेथे गेल्यावर आपला मोबाईल विसरला. येथे मित्राकडे आलो आहे, त्याला बोलावून घेऊन पैसे देतो, असे सांगून तो रिक्षाचालकाचा मोबाईल घेत असत. त्यावरुन तो फोन लावल्याचा बहाणा करीत व बोलत रिक्षापासून काही अंतर चालत जाऊन गर्दीतून पळून जात असे. रिक्षाचालक मित्राला घेऊन येतो, असे वाटून त्याची वाट पहात थांबत. अशा प्रकारे आसिफने कॅम्प, वानवडी, कोंढवा, येरवडा भागात अनेक रिक्षाचालकांचे मोबाईल चोरले आहेत. ५० ते ६० मोबाईल चोरल्याचे तो सांगत आहे. त्यापैकी काही मोबाईल त्याने मुंबईत विकले असून त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेMobileमोबाइलPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षाtheftचोरीThiefचोरArrestअटक