अश्लील व्हिडीओ विकून 'तो' कमवायचा पैसे
By भाग्यश्री गिलडा | Updated: February 28, 2024 17:52 IST2024-02-28T17:52:03+5:302024-02-28T17:52:30+5:30
आरोपी ऑनलाईन पद्धतीने अश्लील व्हडिओ आणि फोटोची विक्री करायचा

अश्लील व्हिडीओ विकून 'तो' कमवायचा पैसे
पुणे: अश्लील फोटो आणि व्हिडीओ ऑनलाईन विक्री करून पैसे कमावणाऱ्या पियुष बिरमल (रा. सोमवार पेठ) याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पियुष बिरमल हा ऑनलाईन पद्धतीने अश्लील व्हडिओ आणि फोटोची विक्री करायचा. टेलिग्रामवर एक ग्रुपद्वारे फोटो आणि व्हिडीओ विक्री करत असल्याची माहिती गुप्तहेरांकडून मिळाली. मंगळवारी (दि. २७) पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पियुष बिरमल याला शोधण्यासाठी समर्थ पोलीस ठाण्याचे पथक रावण झाले. त्यावेळी तो सोमवार पेठ येथे असलेल्या त्याच्या घरात आढळून आला. त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन आल्यावर चौकशीदरम्यान अश्लील व्हिडीओ आणि फोटो विक्री करत असल्याची कबुली दिली. २०२२ पासून हे फोटो आणि व्हिडीओ विक्री करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६ मोबाईल आढळून आले. त्यामध्ये २०२२ पासूनचा अश्लील चित्रफिती असल्याचे प्राथमिक तपासात समजले. याप्रकरणी त्याच्यावर माहिती तंत्रज्ञात अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करत आहेत.