शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

दारूची दुकाने सुरु झाल्याने निवारा केंद्रातून " त्यांनी " काढला पळ; पोलिसांनी चोप देऊन टाकले पुन्हा आत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 21:00 IST

पुण्यातील एका शाळेत मुक्कामाला परप्रांतीय मजूर तसेच बेघरांमध्ये पळापळ सुरू

ठळक मुद्देसाधू वासवाणी मिशनच्या वतीने निवारा केंद्रात चहा, दूपारी व रात्री जेवण व्यवस्था

पुणे: दारूविक्री खुली झाल्याने निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या परप्रांतीय मजूर तसेच बेघरांमध्ये पळापळ सुरू झाली आहे. महापालिकेच्या कोरेगाव पार्क येथील कस्तूरबा शाळेतून मंगळवारी रात्री असा पळ काढणाऱ्या चौघांंना पोलिसांनी चोप दिला व पुन्हा आत टाकले.या शाळेत एकूण १३५ जण आश्रयाला आहेत. २७ मार्चपासून ते याच ठिकाणी मुक्कामास आहेत. बेघर, निराधार तसेच परप्रांतीय मजूर, हॉटेलमध्ये काम करणारे वेटर वगैरेंचा त्यात समावेश आहे. त्यात ५ महिलाही आहेत. शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.साधू वासवाणी मिशनच्या वतीने त्यांना सकाळी व संध्याकाळी चहा, दूपारी व रात्री जेवण मिळते. त्यांच्या अंथरूण पांघरूणाचीही व्यवस्था मिशनने केली आहे. त्यांच्यासाठी सकाळ संध्याकाळ पाण्याचे टँकर मागवण्यात येतात. एका वर्गखोलीत ५ ते ८ जण अशी सोय आहे. बाथरूम, टॉयलेटही आहे.इतके सगळे व्यवस्थित असतानाही त्यांच्यातील काहीजणांकडून सहकार्य मिळत नाही असे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असलेले रखवालदार भोसले यांनी सांगितले.मद्यविक्री सुरू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्यातील बरेच जण अस्वस्थ झाले होते. ग्रूप करून त्यांची चर्चा सुरू होती. पोटात दूखते, दवाखान्यात जायचे आहे, औषध खरेदी करायचे आहे, मित्राला भेटून येतो असे बहाणे करून दुपारीच पळ काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र साहेब आल्याशिवाय जाता येता येणार नाही म्हणून त्यांना संध्याकाळपर्यंत थांबवले.मात्र रात्रीच्या जेवणाआधी त्यांच्यातील चौघांनी पळ काढला, पण त्याची लगेच माहिती मिळाल्याने १०० नंबरला फोन केला. कोरेगाव पोलिस चौकीच्या चार पोलिसांनी त्याची दखल घेत चौघांनाही लगेच शोधले व पुन्हा केद्रात आणून सोडले अशी माहिती रखवालदार भोसले यांनी दिली.या केंद्राचे व्यवस्थापक, पालिकेचे सहायक शिक्षणाधिकारी विजय आवारी म्हणाले, सर्वांची नीट व्यवस्था केली आहे. जेवण चहा सगळे वेळच्यावेळी मिळते आहे. दर दोन दिवसांनी एका स्वतंत्र वैद्यकीय पथकाद्वारे त्यांची वैद्यकीय तपासणीही होत आहे. परराज्यातील मजूरांना स्थलांतर करण्याची परवानगी मिळाल्यावर त्यांच्यातील काहींना तूम्हाला जायचे आहे का असे विचारले, मात्र त्यांनी आमचे काम सुरू होणार आहे असे सांगून नकार दिला. काहीजण वेटर आहेत, त्यांनीही हॉटेल सुरू झाले की आम्हाला काम मिळेल, त्यामुळे सध्या इथेच बरे आहे असे सांगितले. काहीजण मात्र इथून पळून जाण्याच्या बेतात आहेत, मात्र पोलिसांना कळवल्यावर ते शांत झाले आहेत.  

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस