दिवसाढवळ्या घराचे कुलुप तोडून तब्बल पावणे पाच लाखांचे दागिने पळवले; राजगुरूनगरच्या भरवस्तीमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 19:39 IST2022-04-27T19:39:39+5:302022-04-27T19:39:46+5:30

कपाटातील लॉकर तोडुन लॉकरमधील दागिने, पैसे मिळून चार लाख ७५ हजाराचे सोन्याचे दागिने चोरटयांनी लांबविले.

He broke the lock of the house in broad daylight and stole five lakhs of jewelery Incidents in the trust of Rajgurunagar | दिवसाढवळ्या घराचे कुलुप तोडून तब्बल पावणे पाच लाखांचे दागिने पळवले; राजगुरूनगरच्या भरवस्तीमधील घटना

दिवसाढवळ्या घराचे कुलुप तोडून तब्बल पावणे पाच लाखांचे दागिने पळवले; राजगुरूनगरच्या भरवस्तीमधील घटना

राजगुरुनगर : दिवसाढवळ्या बंद घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पाऊणे पाच लाख रुपायांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना आज (दि २७ )रोजी राजगुरूनगर येथील वाडारोड येथे घडली आहे. याबाबत शंकर नामदेव पानमंद ( रा .वाडा रोड ,अन्नास्मृती बंगला दुसरा मजला , ता खेड ) यांनी खेडपोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पानमंद त्यांची पत्नी, दोन मुले, भाऊ हे वाडारोड येथे एकत्रित राहतात. सकाळी दहा वाजता पानमंद पती पत्नी कामानिमित्त नेहमीप्रमाणे बाहेर गेले होते. मुले क्लासला गेली होती. अज्ञात चोरट्यांनी सकाळी ते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसताना बंद घराचे कुलुप तोडून घरामध्ये प्रवेश केला. कपाटातील लॉकर तोडुन लॉकरमधील दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, चार तोळे सोन्याचे मनी मंगळसूत्र किंमत दोन लाख रुपये, तसेच ७५ हजार रुपये किंमतीचे कानातील दागिने व टॉपस दिड तोळे वजनाचे असा चार लाख ७५ हजाराचे सोन्याचे दागिने चोरटयांनी लांबविले. पुढील तपास पोलिस हवालदार संतोष घोलप करित आहे.

Web Title: He broke the lock of the house in broad daylight and stole five lakhs of jewelery Incidents in the trust of Rajgurunagar