शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

जिल्हा परिषदेत शिकून तो झाला लष्करी अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 11:00 PM

एनसीसीतून मिळाली प्रेरणा

ठळक मुद्देजालन्यातील मुलाची कामगिरी : एनडीएच्या १३७ व्या तुकडीतून उत्तीर्णतीन वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून तो नौदलात अधिकारी होणार

पुणे : प्रत्येक पालकांची आपला मुलगा मोठ्या शाळेतून शिकावा अशी असते. यामुळे  जिल्हा परिषदांच्या शाळेतील मुलांची संख्या कमी होत आहे. मात्र, जालना येथील एका मुलाने सर्वसामान्यांचा हा समज दुर केला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून शिक्षण घेत त्याने लष्कराची कुठलीही पार्श्वभूमी नसताना एनडीएत प्रवेश मिळवला. तीन वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून तो नौदलात अधिकारी होणार आहे. राहूल लाड असे या धैय्यवेड्या तरूणाचे नाव आहे. राहुल हा जालण्या जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाळा या गावचा आहे. या गावातच जिल्हा परिषद शाळेत त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. यानंतर औरंगाबाद येथील सर्व्हिसेस प्रीपेटरी इन्स्टिट्यूट (एसपीआय) या विद्यालयात त्यांने प्रवेश घेतला. येथून  ११ वी आणि १२ वी करतांना लष्कराचे आकर्षण असल्याने त्याने एनसीसीत प्रवेश घेतला. यामुळे लष्करी जीवन त्यांला जवळून अनुभता आहे. याच काळात त्याचे लष्करात जाण्याचे ठरवले आणि एनडीएमध्ये जाण्याची त्याची धडपड सुरू झाली. एसपीआय मध्येच त्यांने एनडीएच्या परिक्षेची तयारी केली. तयारी करतांना विद्यालयातील शिक्षकांचे त्याला मार्गदर्शन लाभले. यामुळेच एनडीएच्या परीक्षेत पास होता आले असे राहूलने सांगितले.  राहुल हा सामान्य घरातील मुलगा आहे. त्याचे वडील एका खाजगी साखर कारण्यात क्लार्क म्हणून कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाल्याने घरची जबाबदारी त्याचा मोठा  भाऊ बाळासाहेब याच्यावर आली. तो शिक्षक आहे. आपला भाऊ अधिकारी व्हावा या उद्देशाने त्याने राहुलच्या स्वप्नांना उभारी दिली. भावाच्या परिश्रमाचे चीज करत त्याने एनडीएतील खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे.  राहुलच्या घरात लष्कराची कुठलीही पार्श्वभूमी नाही. त्याने स्वत: लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. वडीलांना याबबत त्याने बोलून दाखलवले. मात्र, वडिलांना याची काही माहिती नव्हती. त्यांची निवड झाल्यानंत त्याने वडीलांना याची  माहिती दिली. मात्र, मुलाच्या यश पाहून त्यांचे उर भरून आले आहे. .......... एनसीसीने दाखवले एनडीएचे स्वप्न शाळेत असतांना भविष्यात आपण काय व्हावे याबाबत राहुलने कधी विचार नव्हता केला. अभ्यासात हुशार असल्याने त्याने औरगाबाद येथे महाविद्यालयात प्रवेश घेतला. या सोबतच त्याने एनसीसीतही प्रवेश घेतला. एनसीसीच्या एका कॅप्ममध्ये लष्करी अधीकारी  आले. त्यांनी तेथे एनडीए प्रवेशाबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनापासून प्रभावीत होत राहुलने एनडीएची तयारी केली. पायाभूत माहिती मिळवून त्याने अभ्यासाला सुरूवात केली. सुरवातीला त्याला दोनचा अपयश आले. मात्र, तिस-या प्रयत्नात अवघड परीक्षा त्याने उत्तीर्ण केली.  ...........ग्रामीण भागातील मुलांना न्यूनगंड असतो. मात्र, ते हुशार असतात. शिक्षण घेत असतांना स्वत:तील कौशल्य ओळखलते तर हवे ते साध्य करता येते. मीही तेच केले.   मी जर एनडीए मध्ये लष्करी प्रशिक्षण पूर्ण करू शकतो तर ते ग्रामीण भागातील कोणताही विद्यार्थी पूूर्ण करू शकतो. शहरी मुलांनी दहा तास अभ्यास केला तर मला १२ तास करावा लागायचा. ग्रामीण भागातील मुलांकडे चिकाटी उपजतच असते फक्त जिद्द  बाळगायला हवी.    - राहूूल लाड, एनडीए पास आउट कॅडेट  

                    

टॅग्स :Puneपुणेnda puneएनडीए पुणेzpजिल्हा परिषद