कंटनेरमध्ये ग्रंथालय कधी पाहिलंत का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 03:12 PM2020-02-27T15:12:21+5:302020-02-27T15:13:22+5:30

पुण्यातल्या आळंदीजवळ एका कंटनेरमध्ये ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. याला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Have you ever seen library in container rsg | कंटनेरमध्ये ग्रंथालय कधी पाहिलंत का ?

कंटनेरमध्ये ग्रंथालय कधी पाहिलंत का ?

Next

पुणे : आजची पिढी वाचत नाही, ती माेबाईलमध्येच व्यस्त असते अशी ओरड सातत्याने हाेत असते. परंतु विद्यार्थ्यांना त्यांच्या पद्धतीने वाचनाची गाेडी लावयचा प्रयत्न केला तर त्यांना ती गाेडी लागते. हाच विचार मनात ठेवून बुकवाला या संस्थेकडून एका मालवाहू कंटेनरमध्ये ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. आळंदीजवळील स्नेहवन या ठिकाणी हे ग्रंथालय सुरु करण्यात आले असून या ग्रंथालयात पुस्तके वाचण्यासाठी आता मुलांची गर्दी हाेत आहे. 

बुकवाला संस्थेकडून विविध संस्थांमध्ये ग्रंथालय सुरु करण्यात येते. आळंदी जवळील स्नेहवन या आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे संगाेपन करणाऱ्या संस्थेत ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय बुकवाला संस्थेने घेतला. वेगळ्या पद्धतीचे ग्रंथालय तयार करावे या हेतूने एका कंटेनरमध्ये ग्रंथालय सुरु करण्याचा ठरविण्यात आले. या कंटेनरची आतून सजावट करण्यात आली. बसण्यासाठी साेफे, आकर्षक राेषणाई, पुस्तकांसाठीचे रॅक त्याचबराेबर विविध कथांवरील पुस्तके अशी सगळी व्यवस्था येथे करण्यात आल्याने हे ग्रंथालय मुलांच्या पसंतीस उतरले. 

राेज संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर स्नेहवन संस्थेतील मुले या ग्रंथालयात आनंदाने येतात. आपल्याला हवी असणारी पुस्तके घेऊन तासनतास वाचत बसतात. त्याचबराेबर बुकवाला संस्थेचे स्वयंसेवक दर शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी येत या मुलांसाेबत वेळ घालवतात. त्याचबराेबर त्यांना विविध गाेष्टींची पुस्तके देखील वाचून दाखवतात. बुकवाला संस्था ही अमेरिकेतील कंपनी आहे. या संस्थेचा पुण्याचा अध्यक्ष कल्याण डुबल म्हणाला, आम्ही जेव्हा या संस्थेत ग्रंथालय सुरु करायचे ठरवले तेव्हा काहीतरे वेगळे असावे असा विचार हाेता. त्यातून कंटनेरमध्ये ग्रंथालय सुरु करण्याचे ठरवले. यात हजाराे पुस्तके आहेत. यातील बहुतांश पुस्तके ही इंग्रजीमध्ये आहेत. मुलांना मराठीबराेबरच बदलत्या काळात इंग्रजीसुद्धा यावे या हेतूने हे ग्रंथालय सुरु करण्यात आले याला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळताेय. 
 

Web Title: Have you ever seen library in container rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.