'हसन मुश्रीफांनी नातेवाईकांना कंत्राटे देऊन कोट्यावधी रुपये लाटले'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 14:49 IST2021-10-13T14:42:31+5:302021-10-13T14:49:07+5:30
पुणे : मागील काही काळापासून भाजप नेते किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) राज्य सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर आरोपांच्या फैरी सुरू ...

'हसन मुश्रीफांनी नातेवाईकांना कंत्राटे देऊन कोट्यावधी रुपये लाटले'
पुणे: मागील काही काळापासून भाजप नेते किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) राज्य सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. आज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर (hasan mushrif) पुन्हा आरोप केले आहेत. मुश्रीफांच्या मुलाने बोगस बँक अकाउंट उघडले. या अकाउंटमध्ये ज्या कंपन्या बंद झाल्या तिथून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाले. हा आयपीसीच्या अंतर्गत गुन्हा असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. केंद्र सरकारकडून ग्रामविकास विभागाला १५०० कोटी रुपयांचा निधी आला होता. त्याचे कंत्राट नातेवाईकांना दिले गेले अशी तक्रारही किरीट सोमय्यांनी केली आहे.
जी कंपनी 10 वर्षांपूर्वी बंद झाली होती त्या कंपनीच्या कोट्यावधी रुपये मुश्रीफांनी लाटले. दिलीप वळसे पाटलांनी त्यांची बनवाबनवी कमी करावी. आता मी मुश्रीफांच्या जावयाविरोधात तक्रार दिली आहे. त्यावर लवकरच कारवाई होईल, असही सोमय्या पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी सरकार चालवणारे शरद पवार (sharad pawar) आहेत. जरी मी गुन्हा केला असेल तर तुम्ही माझ्यावर कारवाई करू शकता. राज्यातील कुणीही चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले.