हर्षवर्धन पाटलांची कन्याही कोरोना पॉझिटिव्ह; समाज माध्यमाद्वारे दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 17:09 IST2022-01-02T17:06:15+5:302022-01-02T17:09:54+5:30

माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले

Harshvardhan Patils daughter ankita patil also corona positive Information provided through social media | हर्षवर्धन पाटलांची कन्याही कोरोना पॉझिटिव्ह; समाज माध्यमाद्वारे दिली माहिती

हर्षवर्धन पाटलांची कन्याही कोरोना पॉझिटिव्ह; समाज माध्यमाद्वारे दिली माहिती

पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्यासोबत भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील यांचा 28 डिसेंबरला विवाह झाला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी स्वत: समाज माध्यमाद्वारे कोरोना झाल्याची माहिती दिली होती. तसेच संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले होते. आज सकाळी पाटील यांची कन्या अंकिता यांनी ट्विटरवरून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. 

''आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.'''

विवाह सोहळ्यास राज्यातील महत्वाच्या नेत्यांनी हजेरी

मुंबईत झालेल्या या विवाह सोहळ्यास राज्यातील महत्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हर्षवर्धन पाटील यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होऊ लागली आहे.

 हर्षवर्धन पाटील यांची तब्येत उत्तम

सध्या ब्रीच कँडी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन पाटील उपचार घेत आहेत. आवश्यक विविध वैद्यकीय तपासण्यांचे त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. आज शुक्रवारी हर्षवर्धन पाटील यांची तब्येत उत्तम आहे, थोडाफार थकवा जाणवत आहे. मात्र दैनंदिन कामकाज रुग्णालयात असूनही नेहमीप्रमाणे सुरु आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातून हर्षवर्धन पाटील यांना लवकर घरी सोडण्यात येईल. 

Web Title: Harshvardhan Patils daughter ankita patil also corona positive Information provided through social media