शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

इंदापूर पंचायत समितीवर पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्या गटाचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 17:49 IST

गुलाल व हलगीच्या कडकडाटात जल्लोष

ठळक मुद्देसभापतिपदी पुष्पाताई रेडके, तर उपसभापतिपदी संजय देहाडे : इंदापूर पंचायत समिती ही  एकूण १४ सदस्यांचीअप्रत्यक्षपणे इंदापूर पंचायत समिती ही भाजपाच्या ताब्यात

इंदापूर : राज्यात पंचायत समितीच्या पार पडलेल्या सभापती व उपसभापती निवडीमध्ये इंदापूर पंचायत समितीमध्ये राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याच गटाचे सलग दुसऱ्या वेळेस कारभार आल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.यावेळी इंदापूर पंचायत समिती सभापतिपदी पडस्थळ येथील पुष्पाताई रेडके तर उपसभापतिपदी भिगवण गणातुन निवडून आलेले संजय देहाडे यांची निवड झाली आहे. त्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील गटाकडे पुन्हा एकदा इंदापूर पंचायत समितीची सूत्रे हाती आली आहेत. त्यामुळे यावेळी शेकडो पाटील समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करत हलगीच्या कडकडाटात सभापती  व उपसभापती यांच्या निवडीचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. इंदापूर पंचायत समिती ही  एकूण १४ सदस्यांची असून, यामध्ये मागील पंचायत समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसच्या लढतीत काँग्रेस पक्षाची बाजी मारली होती. मात्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केल्याने, सध्या अप्रत्यक्षपणे इंदापूर पंचायत समिती ही भाजपाच्या ताब्यात आली आहे. पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडणुकीमध्ये वेगळा चमत्कार घडणार अशी चर्चा होती. मात्र, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालणा-या पंचायत समितीवर पुन्हा एकदा माजीमंत्री पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.या निवडणूकीच्या दरम्यान राष्ट्रवादी पक्षातून निवडून गेलेला एक सदस्य गैरहजर असल्याने, राष्ट्रवादीचे संख्याबळ १ ने घटले व ५ विरुद्ध ८ असा काँग्रेसचा विजय झाला. त्यामुळे सभापती म्हणून पुष्पाताई रेडके तर उपसभापती म्हणून संजय देहाडे यांचा विजय झाला. २०१७ मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पक्षाचे ८ सदस्य निवडून आले होते तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेसचे ६ सदस्य निवडून आले होते. त्या वेळी सभापती म्हणून खुल्या प्रवगार्तुन करणसिंह घोलप यांची तर उपसभापती म्हणून देवराज जाधव यांची निवड झाली होती.  नंतर च्या काळात हर्षवर्धन पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश त्या मुळे  किती सदस्य हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत जाणार या कडे सर्वांचे लक्ष होते.यावेळी बोट वर करून झालेल्या मतदानात सभापती पदासाठी रेडके यांना ८ मते तर वणवे याना ५ मते मिळाली उपसभापती पदासाठी पाटील गटांचे संजय देहाडे यांना ८ मते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारिका लोंढे यांना ५ मते मिळाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  सदस्य प्रदिप जगदाळे या वेळी अनुपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती व उप सभापती याचा सत्कार  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी केला या वेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.४अडीच वर्षाचा कालावधी समाप्त झाल्यामुळे सभापती पदाचे आरक्षण नागरिकांचा इतर 

..............................

महिलेचे  वर्चस्व

मागास प्रवर्ग स्त्री असे आरक्षण जाहीर झाल्याने ३१ डिसेंबर रोजी इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या सभेमध्ये पाटील गटाकडून सभापती पदासाठी बिजवडी गणातील पुष्पा रेडके तर उपसभापती पदासाठी भिगवण गणातील संजय देहाडे यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस कडून सभापती पदासाठी शितल वणवे तर उपसभापती पदासाठी सारिका लोंढे यांनी अर्ज दाखल केला होता.

टॅग्स :IndapurइंदापूरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस