Pune Crime | सरकारी कामात अडथळा आणत ग्रामसेविकेचा विनयभंग; नारोळी ग्रामपंचायतमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 12:01 IST2023-03-27T11:59:45+5:302023-03-27T12:01:41+5:30
वडगाव निंबाळकर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल...

Pune Crime | सरकारी कामात अडथळा आणत ग्रामसेविकेचा विनयभंग; नारोळी ग्रामपंचायतमधील घटना
सुपे (पुणे) : जुन्या बांधलेल्या गाईगोठ्याचे मस्टर काढण्याच्या कारणावरून महिला ग्रामसेविका यांना दमदाटी करत, विनयभंग केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना गुरुवारी (दि. २३ ) दुपारी साडेतीनच्या सुमारास नारोळी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली. दत्तात्रय मारुती ढमे ( रा.नारोळी ता.बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय ढमे याने जुन्या बांधलेल्या गाईगोठ्याचे मस्टर काढण्याचे कारणावरून फिर्यादी ग्रामसेविकेस दमदाटी केली, तसेच फिर्यादी या सरकारी काम करीत असताना, ऑफिसचे दप्तर ओढून सरकारी काम करून दिले नाही, तसेच मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तेथून निघुन गेला. तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सलिम शेख करीत आहेत.