Pune: उसने पैसे वेळेत परत न केल्यामुळे विनयभंग; स्वयंपाकासाठी बाेलावून नकाे त्या ठिकाणी केला स्पर्श
By विवेक भुसे | Updated: July 29, 2023 18:23 IST2023-07-29T18:22:54+5:302023-07-29T18:23:56+5:30
धायरीतील धक्कादायक घटना....

Pune: उसने पैसे वेळेत परत न केल्यामुळे विनयभंग; स्वयंपाकासाठी बाेलावून नकाे त्या ठिकाणी केला स्पर्श
पुणे : उसने घेतलेले पैसे परत देता न आल्याने महिलेला स्वयंपाकासाठी बोलावून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जयवंत सोपान राऊत (वय ५७, रा. आकाशदीप सोसायटी, गणेशनगर, धायरी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २९ वर्षांच्या महिलेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार राऊत याच्या धायरी येथील घरी १६ व २८ जुलै रोजी घडला.
फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांनी आरोपीकडून २५ हजार रुपये उसने घेतले होते. ते पैसे त्या वेळेवर परत देऊ शकल्या नाहीत. तेव्हा राऊत यांनी फिर्यादी यांना स्वयंपाकासाठी घरी बोलावले. अडचणीत असलेल्या फिर्यादी स्वयंपाक करण्यासाठी १६ जुलै रोजी त्यांच्या घरी गेल्या. त्या स्वयंपाक करत असताना नको त्या ठिकाणी हात लावून त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर शुक्रवारी २८ जुलै रोजी त्याने त्यांना पुन्हा बोलावले. त्यांना वेळोवेळी फोनवर रिलेशनशिप ठेव, असे म्हणून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पोलिस हवालदार गवळी तपास करीत आहेत.