शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सखी अनुभवणार ‘जल्लोष २०१५’

By admin | Updated: February 15, 2015 00:04 IST

सखींच्या जीवनातील विविध टप्पे उलगडणारा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करणारा ‘जल्लोष नात्यांचा २०१५’ हा अनोखा कार्यक्रम अनुभवण्याची संधी सखींना मिळणार आहे.

पुणे : मैत्रीण, मुलगी, बहीण, पत्नी, आई, सासू... अशा विविध नात्यांची गुंफण घालत पुरूषांच्या बरोबरीने आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सखींच्या जीवनातील विविध टप्पे उलगडणारा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करणारा ‘जल्लोष नात्यांचा २०१५’ हा अनोखा कार्यक्रम अनुभवण्याची संधी सखींना मिळणार आहे. लोकमत सखी मंच आणि राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या (अमरीश जैैन ग्रुप) वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारका नात्यांमधील अतुट बंध मनोरंजनातून सखींसमोर उलगडतील. चिंचवड येथील तानाजीनगरमध्ये शिवाजी उदय मंडळाच्या प्रांगणात शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम रंगणार आहे. कुटूंबातील प्रत्येकाच्या सुखासाठी झटणारी स्त्री समाजातही आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मान-सन्मान मिळविते. अनेक नातेसंबंध जपत पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करते. कुटूंबासह समाजातील विविध जबाबदाऱ्या लीलया पार पाडत यशाचे शिखर गाठते. या सखींचा सन्मान करण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोकमत सखी मंचने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ‘जल्लोष २०१५’ हा त्यातीलच एक उपक्रम आहे. रोजच्या कामाच्या व्यापातून थोडीशी उसंत काढत त्यांना मनोरंजनाचा आस्वाद घेता यावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लोकमत सखी मंचच्या सभासदांना या मैफलीत सहभागी होता येईल. स्त्रीयांच्या जीवनातील विविध टप्पे, त्यांनी मिळविलेले यश, विविध नातेसंबंध जपताना करावी लागणारी तारेवरची कसरत... असे सारे काही गाणी आणि नृत्याच्या माध्यमातून मनोरंजकरीत्या या कार्यक्रमातून उलगडताना सखींना अनुभवता येईल. मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांच्या या अनोख्या मैफलीने कार्यक्रमात धम्माल येणार आहे. हिंदी गाणी, शेतकरी नृत्य, लावणी आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रमांचा नजराणा या मैफलीत असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सखींमधूल लकी ड्रॉ काढला जाणार आहे. यातील भाग्यवान विजेत्यांना सोने व चांदी जिंकण्याची संधी मिळेल. त्यामध्ये प्रथम बक्षीस १ लाखाचे सोने, द्वितीय बक्षीस ७५ हजार रुपयांचे सोने, तृतीय बक्षीस ५० हजार रुपयांचे सोने आणि उत्तेजनार्थ २५ हजार रुपयांची तीन चांदीची बक्षिसे असतील. तसेच उपस्थितांमधून विशेष लकी ड्रॉही काढला जाणार आहे. त्यामुळे मनोरंजनाबरोबर सोन्या- चांदीची लयलुट करण्याची सुवर्णसंधी सखींसाठी अनोखी भेट असणार आहे.