राज ठाकरे अन् आदित्य ठाकरेंना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा; पुण्याच्या बॅनरने चर्चांना उधाण

By अतुल चिंचली | Updated: June 9, 2025 13:34 IST2025-06-09T13:33:27+5:302025-06-09T13:34:32+5:30

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर पुण्यातल्या शिवसैनिकांची भावनिक साद असल्याचे या बॅनरच्या माध्यमातून दिसून आले आहे

Happy birthday wishes to Raj Thackeray and Aditya Thackeray on the same banner; Pune's banner sparks discussion | राज ठाकरे अन् आदित्य ठाकरेंना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा; पुण्याच्या बॅनरने चर्चांना उधाण

राज ठाकरे अन् आदित्य ठाकरेंना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा; पुण्याच्या बॅनरने चर्चांना उधाण

पुणे : पुण्यात शिवसैनिकाने राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर पुण्यातल्या शिवसैनिकांची भावनिक साद असल्याचे या बॅनरच्या माध्यमातून दिसून आले आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात शिवसेना उपविभाग प्रमुख गिरीश गायकवाड यांनी दोघांना शुभेच्छा देणारा बॅनर लावला आहे. 

राज ठाकरेंनी एका मुलाखतीत युतीसंदर्भात सुचक वक्तव्य केल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून आले होते. महाविकास आघाडीचे आणि शिवसेनेचे नेते याबाबत सकारात्मक असल्याचे दिसते आहे. परंतु याबाबत दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

आता पुण्यात लागलेल्या या बॅनरने पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आले आहे आहे. गिरीश गायकवाड या पुण्यातील शिवसैनिकाने स्वारगेट परिसरात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकाच बॅनरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांचा १३ जून रोजी वाढदिवस आहे. तर राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने एका बॅनरवर शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर पुण्यातल्या शिवसैनिकांची भावनिक साद दिल्याचे या बॅनरच्या माध्यमातून दिसून आले आहे. 

दरम्यान मनसेकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. राज ठाकरेंनी सुद्धा मनसे पदाधिकाऱ्यांची झालेल्या बैठकीत युतीवर भाष्य न करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Web Title: Happy birthday wishes to Raj Thackeray and Aditya Thackeray on the same banner; Pune's banner sparks discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.