प्रेयसीच्या डोक्यात हातोडीने वार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:33 IST2018-05-04T16:33:58+5:302018-05-04T16:33:58+5:30

तू मला का टाळत आहेस' अशी विचारणा करत तिच्या डोक्यात हातोडीने वार केला. 

Hammered attack on girl friend head | प्रेयसीच्या डोक्यात हातोडीने वार 

प्रेयसीच्या डोक्यात हातोडीने वार 

ठळक मुद्देमहिलेच्या पतीचे चार वषार्पूर्वी निधन झाले असून तिला एक दहा वर्षाची मुलगी

भोसरी - तू मला का टाळत आहेस अशी विचारणा करत प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात हातोडीने वार केला. बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास भोसरीतील चांदणी चौक येथील रौनक लॉजवर ही घटना घडली. 
याप्रकरणी येथे राहणाऱ्या एका पस्तीस वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील आत्माराम कुंभार (रा. कसगावडी, ता. लोणावळा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीचे चार वषार्पूर्वी निधन झाले असून तिला एक दहा वर्षाची मुलगी आहे. आरोपीचे व या महिलेचे प्रेम संबंध आहेत. त्याने तिला लॉजवर बोलावले. तेथे तू मला का टाळत आहेस' अशी विचारणा करत तिच्या डोक्यात हातोडीने वार केला. 

Web Title: Hammered attack on girl friend head