खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 18:59 IST2018-05-07T18:59:44+5:302018-05-07T18:59:44+5:30
भांडणे करण्यास मज्जाव करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात बॅटने मारून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी फरारी आरोपीस अटक केली.

खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी जेरबंद
येरवडा : येथील जिजामाता नगरमध्ये भांडणे करण्यास मज्जाव करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात बॅटने मारून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी शुभम अजय शिंदे (वय २० रा. वडारवस्ती, येरवडा) या फरारी आरोपीस सोमवारी (दि. ७) अटक केली. रामचंद्र बबन चव्हाण (वय ४२ रा. जिजामाता नगर) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चव्हाण यांच्या घरासमोर रविवारी (दि. ६) भांडणे सुरू असल्याने त्यांनी सदर मुलांना हटकले व त्यांच्या घरापासून दूर जाण्यास सांगितले. यामुळे शिंदे याला राग आला व थोड्या वेळाने तो पुन्हा चव्हाण यांच्या घरासमोर आला. चव्हाण हे बहिणीसमवेत अंगणात गप्पा मारत होते. त्यावेळी बेसावध असलेल्या चव्हाण यांच्या डोक्यात शिंदेने बॅट मारली अन त्यांना गंभीर जखमी करून तेथून पळून गेला. शिंदे हा चित्रा चौकात लपून बसल्याची माहिती मिळाल्याने सहायक फौजदार बाळासाहेब बहिरट, ख्रिस्तोफर मकासरे, हवालादर अजिज बेग, विष्णू सरवदे, पंकज मुसळे, गणेश पाटोळे यांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.