शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीच्या वादातून येरवड्यात जमावाचा प्राणघातक हल्ला, ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 19:39 IST

कंपनी चालू ठेवायची असेल तर मला एक लाख रुपये हप्ता आणून दे अशी फोनवरून दिली धमकी

ठळक मुद्देतीन आरोपींना अटक ; गाड्यांची मोडतोड करत दहशत निर्माण करण्याचा

पुणे:  चुलत भावाच्या लग्नाला बोलावले नाही याचा राग मनात ठेवून खंडणीची मागणी करत जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना शुक्रवारी रात्री येरवड्यात घडली. कुंदन सिंग लक्ष्मण सिंग बावरी (वय28 रा. अशोक नगर, येरवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकरा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमितसिंग जुली (वय 21) खन्नासिंग कल्याणी (वय 42) व निलेश खंडागळे (वय 29 ,तिघेही रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना नऊ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण सिंग बावरी यांची खराडी येथे लक्ष्मी फाउंड्री नावाने कंपनी आहे. 24 फेब्रुवारी रोजी खन्ना सिंग कल्याणी याने कुंदन सिंग याला कंपनी चालू ठेवायची असेल तर मला एक लाख रुपये हप्ता आणून दे अशी फोनवरून धमकी दिली होती. यानंतर खन्ना सिंग याने वेळोवेळी फोन करून खंडणी दिली नाही तर जीवे मारून टाकू असे धमकावले देखील होते. 6 मार्च रोजी येरवडा येथे कुंदन सिंग याचा चुलतभाऊ अजित सिंग याचे लग्न होते. या लग्नाला खन्ना सिंग व त्याच्या इतर नातेवाईकांना बोलावले नव्हते. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कुंदनसिंग अशोकनगर येथील रस्त्यावर उभा असताना खन्नासिंग कल्याणी व त्याचे इतर दहा ते बारा साथीदार तीक्ष्ण हत्यारे घेऊन आले. यावेळी त्यांनी कुंदन सिंग याच्यावर हल्ला केला. कुंदन सिंग जीव वाचवत पळत घराच्या दिशेने गेला. यातील उर्वरित साथीदारांनी घटनास्थळी महिंद्रा पिकअप,  पॅगो टेम्पो व बुलेट गाडीचे मोडतोड करून नुकसान केले. याप्रकरणी आरोपींनी गाड्यांची मोडतोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित फरारी आरोपींचा येरवडा पोलीस शोध घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे करीत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक