शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

दरोडा टाकून ट्रक लुटणारी हडपसरची 'कोयता गॅंग' जेरबंद; १७ लाख २७ हजारांचा ऐवज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 7:11 PM

चोरीला गेलेला ट्रक सासवड- नारायणपूर रोडवर उभा असून ट्रकमधील माल विक्री करण्यासाठी चौघे जण ग्राहकांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली..

ठळक मुद्दे६ जणांना अटक, दोन अल्पवयीन मुलांचा समावेश; एक महिला फरार

पुणे : कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकून ट्रक लुटणाऱ्या हडपसर येथील कोयता गॅगला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यात ६ जणांना अटक केले असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांच्यातील एक महिला फरार आहे. अतुल बाबुराव गजरमल (वय ३०), गणेश उर्फ दादया विठ्ठल हवालदार (वय २०), लक्ष्मण ऊर्फ पंकज धनंजय जाधव (वय २०), समीर लियाकत पठाण (वय २२), तेजस बाळासाहेब खळदकर (वय २३), विनोद ऊर्फ भैया विठ्ठल आदमाने (वय २१, सर्व रा़ हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ त्यांच्या ताब्यातून १७ लाख २७  हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौफुला ते मोरगाव रोडवरील पडवी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी कारमधून येऊन एका ट्रकचालकाला कोयत्या धाकाने लुटले होते. यावेळी कपड्यांच्या धाग्यांचे १४६ बंडल, प्लास्टिकचे १२ रोल, ट्रक व ४ हजारांची रोख रक्कम असा १७ लाख २७ हजारांचा माल चोरला होता. चोरट्यांनी ट्रकचालक व त्याच्या सहकाऱ्याला पुसेगाव घाटात सोडून दिले होते. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.             या गुन्ह्याचा तपास करत असताना चोरीला गेलेला ट्रक सासवड नारायणपूर रोडवर उभा असून ट्रकमधील माल विक्री करण्यासाठी चौघे जण ग्राहकांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.त्यानुसार पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, कर्मचारी सचिन गायकवाड, महेश गायकवाड, दत्तात्रय तांबे, निलेश कदम, प्रकाश वाघमारे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी ९ जणांनी मिळून गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपींपैकी अतुल गजरमल याच्याविरुद्ध पूर्वी जबरी चोरी, खंडणी मागणे, मारहाण करणे व खुनाचा प्रयत्न करणे, गणेश हवालदार याच्याविरुद्ध मारहाण करणे, दरोड्याच्या तयारीत मिळून येणे, समीर पठा याच्याविरुद्ध बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, जबरी चोरी, मारहाण करणे, तेजस खळदकर विरुद्ध मारहाण करणे असे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस