शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रोहित माझे नाव घेईल याची कल्पना नव्हती; सुखद धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 15:14 IST

विधान भवनात शपथ घेताना तो माझे नाव घेईल, याची मला  कल्पना नव्हती..

ठळक मुद्देआई सुनंदा पवार यांची भावना

बारामती :जे आतापर्यंत कोणी केले नव्हते ते रोहितने केले. विधान भवनात शपथ घेताना तो माझे नाव घेईल, याची मला  कल्पाना नव्हती. ज्यावेळी त्याने मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार असा उल्लेख केला. तेंव्हा सुखद धक्का बसला.प्रथमच कोणत्याही आमदाराने शपथ घेतेवेळी आईच्या नावाचा उल्लेख केला. एका आईला जे समाधान वाटेल तेच समाधान आज मला वाटत आहे. रोहितने राज्यात आदर्शवत ठरावं असं काम करावे, एवढीच माझी अपेक्षा आहे, अशी भावना आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी व्यक्त केली.

आमदार रोहित पवार यांनी आज विधानभवनामध्ये विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेताना मी आमदार रोहित सुनंदा राजेंद्र पवार असा उल्लेख केल्याने सभागृहातील सदस्यांना देखील सुखद धक्का बसला. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार असणाऱ्या रोहित पवार यांनी आमदारकीची शपथ घेताना आपले वेगळेपण दाखवून दिले. एकीकडे सर्व आमदारांनी आपले संपूर्ण नाव घेत शपथ घेतली. मात्र रोहित पवार यांनी शपथ घेण्यास सुरुवात करताना आवर्जून आपल्या आईचे नावही घेतले.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये रोहित यांनी माजीमंत्री राम शिंदे यांचापराभव करत विधानसभेची निवडणूक जिंकली.  यापार्श्वभूमीवर ' लोकमत 'शीबोलताना सुनंदा पवार म्हणाल्या, तब्येत बरी नसल्याने मी शपथविधीसाठी जाऊशकले नाही. सध्या बारामतीतच आहे. मात्र कुटूंबातील इतर सदस्य शपथविधीसाठी उपस्थित राहिले. मागील काही दिवसांपासून घरामध्ये तणावाची परिस्थिती होती. तो सर्व तणाव आता निवळला आहे. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते जेवढं पवार साहेबांवर प्रेम करतात तेवढंच प्रेम  अजितदादांवर देखील प्रेम करतात. आमचं कुटूंब अखंड आहे आणि राहणार, असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच ज्या कर्जत-जामखेड मतदार संघाने रोहितला निवडुन दिले त्या मतदार संघामध्ये आदर्शवत काम त्याने उभे करावे. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. त्या भागात रस्ते, पाणी आणि विजेची समस्या आहे. आमदार होण्याच्या आधीपासूनच त्याने या कामामध्येस्वत:ला झोकून दिले आहे. आता सुद्धा त्याच्या प्रत्येक कामामध्ये आम्ही कुटूंब म्हणून सोबत असणार आहोत, अशा भावना सुनंदा पवार यांनी व्यक्त केल्या.----------------------------

टॅग्स :PuneपुणेRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019