शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात पुणेकर दंग

By admin | Updated: June 19, 2017 05:24 IST

‘माऊली माऊली’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा अखंड जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर करीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व जगद्गुरू तुकाराम यांच्या पालख्यांचे रविवारी पुण्यात आगमन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘माऊली माऊली’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा अखंड जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर करीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व जगद्गुरू तुकाराम यांच्या पालख्यांचे रविवारी पुण्यात आगमन झाले. लाखो वारकऱ्यांचा भक्तिरसात रंगलेला मेळा शहरात दाखल झाल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले. स्वागतासाठी रांगोळ््यांच्या घालण्यात आलेल्या पायघड्या, चिमुकल्यांचे नृत्य, व्यसनविरोधी प्रबोधनात्मक कार्यक्रम रंगले. संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे कळस येथे साडेबारा वाजता व संत तुकाराममहाराज यांच्या पालखीचे बोपोडीत सव्वाएक वाजता आगमन झाले. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी व नगरसेवक यांनी पालख्यांचे शहरात स्वागत केले. पालख्यांच्या स्वागतासाठी पालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्था व पुणेकर नागरिकांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. तुळशीवृंदावने व जलकलश घेतलेल्या महिला, भगवे ध्वज, फेटे आणि उपरणी परिधान केलेले वारकरी पुण्यनगरीत प्रवेशले आणि प्रसन्नपणाची अनुभूती भाविकांना सुखावून गेली. आधारआश्रम या संस्थेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. कितीही संकट आले तरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका, असे कळकळीचे आवाहन ही मुले करीत होती. तंबाखूच्या व्यसनाविरोधात जागृती करणारे कार्यक्रम या वेळी सादर करण्यात आले. फर्ग्युसन रस्त्यावर पालख्यांच्या स्वागतासाठी उसळणाऱ्या तरुणाईची गर्दी यंदा कमी होती. भारत व पाकिस्तानच्या क्रि केट सामन्यामुळे ही संख्या कमी असल्याचे जाणवत होते. मात्र यामुळे भक्तिभावाने आलेल्या अनेक भाविकांना पालख्यातील पादुकांचे मनसोक्तपणे दर्शन घेता आले. अनेकदा प्रचंड गर्दीमुळे रेटारेटी होऊन पालखीपर्यंत पोहोचणे भाविकांना अशक्य होत होते.बहुतांश संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शहरात आगमन होताच पावसाच्या धारांनी त्यांचे स्वागत होते. मात्र यंदा पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची पाटील इस्टेट व संगमवाडी नवा पूल परिसरात मोठी गर्दी झाली होती. भरउन्हातही रस्त्याच्या दुतर्फा हाती अक्षता, फुले आणि तुळशीची पाने घेऊन भाविक वाट पाहत होते. ‘माऊली’वर थिरकली चिमुकलीएआरडीएस या हेमंत पवार यांच्या वारजेतील डान्स अ‍ॅकॅडमीतर्फे ज्ञानेश्वरमहाराज व तुकाराममहाराज यांच्या पालखीच्या स्वागताला त्यांच्या नृत्य संस्थेतील लहान मुलांच्या स्वरुपातील विठ्ठल-रुक्मिणी हे आकर्षण होते. नंतर या संस्थेतील इतर मुलांसह डेक्कन कॉर्नर येथील चौकात लय भारी या चित्रपटातील माऊली माऊली या गाण्यावर सुंदर नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. सर्व वारकरीबांधवांनी आमच्या या नृत्याचा आनंद घ्यावा, अशी माफक अपेक्षा आमची आहे, असे या संस्थेचील कादंबरी यांनी सांगितले.