शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
3
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
4
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
5
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
6
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
7
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
8
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
9
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
10
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
11
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
12
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
13
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
14
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
15
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
16
इराण चर्चेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? इब्राहीम अजीजी म्हणाले, "प्रत्येक अट स्वीकारली जाणार नाही"
17
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
18
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
19
पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर; आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलणार?
20
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST

लोणी काळभोर : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर ...

लोणी काळभोर : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई करून गुटक्यासह पिकअप व रोख रक्कम असा एकूण २५ लाख ४४ हजार १७२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका गुटखा माफियासमवेत त्याचे साथीदाराला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी सुरेश मिलापचंद ओसवाल ( वय ४४, रा. चिंतामणी पार्श्वनाथ बिल्डिंग, महात्मा फुलेनगर, माळीमळा लोणी काळभोर, ता. हवेली ) व अविनाश भारत जाधव ( वय २५, रा. नायगांव, ता. हवेली ) दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार : सदर कारवाई बुधवार ( ३ फेब्रुवारी ) रोजी रात्री १ - ३० वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार राजू पुुणेकर, मुकुंद आयाचित, सागर चंद्रशेखर, बाळासाहेब खडके यांनी केली आहे.

सदर पथक रात्रगस्त करत लोणी काळभोर गावच्या हद्दीतील राजेंद्र पेट्रोलपंप येथे १२ - ३० वाजण्याच्या सुमारास आले असता धोंडगे यांना बातमीदाराकडुन ओसवाल हा पिकअप नंबर एमएच १२ एसएफ ६९३३ मधून उरूळी कांचन कडुन पुणेकडे जाणार असुन त्याचे बलेरो पिकअप मध्ये संशयास्पद माल आहे. अशी बातमी मिळाली. त्यांनी पथकातील सर्वांना सदर पिकअपचा शोध घेवुन ती मिळुन आलेस तिची पाहणी करून संशयास्पद चिजवस्तु मिळुन आलेस कायदेशिर कारवाई करावयाची अशा सुचना दिल्या. त्याप्रमाणे सदर पथक राजेंद्र पेट्रोलपंप येथुन सुमारे ४ ते ५ किलोमीटर पुढे जावुन परत लोणी काळभोर बाजुकडे येत असताना राजेंद्र पेट्रोल पंपाचे समोर पुणे बाजुकडे जाणारे रोडचे कडेला असणारे अंबरनाथ फर्निचर नांवाचे दुकानासमोर रात्री १ - ३० वाजता आले. त्यावेळी एक पांढरे रंगाचीपिकअप पुणे बाजुकडे जात असताना दिसली. खडके यांनी सरकारी जीप जोरात पुढे घेवुन त्या पिकअपचे समोर थांबविली असता पिकअप चालकाने त्याचे वाहन जागीच थांबविले. सर्वजण खाली उतरून पिकअप जवळ आले. त्यावेळी ड्रायव्हर शेजारी बसलेला गुटका माफिया सुरेश ओसवाल याने पळुन जाण्याचा प्रयत्न केला त्यास पकडले. त्यावेळी त्यानेे

माझे विरूध्द केस केली तर मला मारले असे मी कोर्टाला सांगेल अशी धमकी दिली.

दोघांकडे पिकअप मधील मालासंदर्भात विचारपुस करता त्यांनी प्रथम समाधान कारक माहिती दिली नाही. त्यानंतर ओसवाल याने वाहनात गुटखा असल्याचे सांगितले. त्यामुळे सदरचे वाहण ताब्यात घेतले व सर्वजण रात्री १ - ४५ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आले. व गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये एकुण ४४ पोती व ९ चौकोणी बॉक्स दिसुन आले. त्यांची उघडून पाहणी केली असता त्यामध्ये केशरी युक्त विमल पान मसाला, व्ही १ तम्बाकु पाऊच, प्रिमियम आर.एम.डी. ३.५, एम गोल्ड सेंन्टेड तंम्बाकु आदी गुटका आढळून आला. त्यांचेसमवेत माल वाहुकीसाठी वापरलेली ८ लाख रुपये किमतीची महेंद्र बलेरो पिकअप जप्त करण्यात आली. तसेच सुरेश ओसवाल यांचे अंगझडतीत ५९ हजार ५०० रुपये रक्कम मिळून आली. या रोख रक्कमेबाबत विचार ना केली असता त्यांने सदरचा माल हा निपाणी ( कर्नाटक ) येथुन आणला व काही माल हा येताना रस्त्यात विकला असुन तो विकुन आलेली रक्कम असल्याचे त्याने सांगितले. ओसवाल याचेवर यापुर्वी गुटख्याची विक्री, वाहतूक, साठा केलेबाबतचे एकूण ७ गुन्हे दाखल असून ६ दिवसांपूर्वी गुरुवार ( २८ जानेवारी ) रोजी अन्न व औषधे प्रशासन यांनी कारवाई केलेली असुन त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असुन त्या गुन्हयात तो फरारी आहे. त्याचेवर पुर्वीही अनेक वेळा झालेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणांत गुटका व पानमसाला जप्त करण्यांत आला होता. तो काही महिने येरावडा कारागृहात जावून आला आहे. सध्या तो जामिनावर सुटला आहे. यापैकी तिन प्रकरणाचे खटले शिवाजी नगर पुणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात प्रलंबित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तो हवेली तालुक्यांतील सर्व गुटकाविक्रेत्यांना मालाचा पुरवठा करत आहे. त्यामुळेंच लोणी काळभोर, ऊरूळी कांचनसह सर्व मोठ्या गावांतून पान व किराणा दुकानांतून गुटका खुलेआम विकला जात आहे. यांमागे मोठे रँकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.