शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

अजित पवारांच्या विरोधात माळेगावचे गुरु-शिष्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 12:35 IST

अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा लढविण्यासाठी तब्बल नऊजण इच्छुक आहेत...

ठळक मुद्दे विधानसभा लढविण्यासाठी नऊजण इच्छुकसासवड येथे पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड व भोर मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेणार बारामतीच्या जागेसाठी शिवसेनेची फिल्डिंग 

प्रशांत ननवरे - बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बड्या नेत्यांचे भाजपमध्ये ‘इनकमिंग’ वाढल्यानंतर बारामतीत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा लढविण्यासाठी तब्बल नऊजण इच्छुक आहेत. यापैकी काहींनी मुलाखतीसाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. अजित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या गुरु- शिष्यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्यासह माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले.आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. उमेदवार निश्चितीसाठी भाजप मंगळवारी (दि.२७) सासवड येथे पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड व भोर मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेणार असल्याची माहिती पुणे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. नितीन भामे यांनी दिली. बारामतीत पवार यांच्या विरोधातील इच्छुकांची चर्चा रंगली आहे.भाजपमधून चंद्रराव तावरे, रंजनकुमार तावरे, बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, ज्ञानेश्वर कौले, प्रशांत सातव, कुलभुषण कोकरे, राहुल तावरे आदींची नावे चर्चेत आहेत. एकेकाळी पवार यांचेच त्या काळातील निकटवर्तीय चंद्रराव तावरे यांनी १९९९ साली अजित पवार यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवत ३६ हजार १४१ मते मिळवली. तर पवार यांंना त्या निवडणुकीत ८६ हजार ५०७ मते मिळाली होती. २००९ मध्ये पवार यांच्या विरोधात रंजनकुमार तावरे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. तावरे यांच्या रुपाने भाजपने प्रथमच या मतदारसंघात निवडणूक लढविली. यामध्ये पवार यांना १ लाख २८ हजार ५४४ मते मिळाली होती. तसेच २०१४ मध्ये पवार यांच्या विरोधात भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी बाळासाहेब गावडे यांनी निवडणूक लढविली आहे. यामध्ये पवार यांना १ लाख ५० हजार ५८८ मते, तर गावडे यांना ६० हजार ७९७ इतकी मते मिळाली होती. त्यामुळे तावरे गुरु शिष्य किंवा गावडेंना पुन्हा उमेदवारी मिळणार की भाजप नवीन चेहºयाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवीन चेहºयांमध्ये खैरे, सातव, मोटे हे प्रबळ दावेदार मानले जातात. खैरे यांनी आपण मुलाखत देणार नाही. मात्र, पक्षाने सांगितल्यास निवडणूक लढविणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.दरम्यान, सासवड येथे भारतीय जनता पक्ष पुणे यांच्या वतीने पुणे ग्रामीण भागातील असलेल्या दहा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. याकरिता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निरीक्षक म्हणून रायगड चे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केलेली आहे. नियोजित कार्यक्रमानुसार या वेळी चव्हाण पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. ..........बारामतीत विधानसभा उमेदवारीसाठी ‘त्रिकोण’भाजप शिवसेनेसह महायुतीच्या घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाने देखील बारामतीच्या जागेची मागणी के ल्याचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे बारामतीत सध्या विधानसभा उमेदवारीसाठी ‘त्रिकोण’ निर्माण झाला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासारखा प्रबळ उमेदवार असूनदेखील तिन्ही पक्षांनी मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत घटक पक्षांकडे जागावाटपबाबत दुर्लक्ष करणाऱ्या  महायुतीने विधानसभा निवडणुकीत घटकपक्षांना जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात कोण लढणार, याबाबत राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत........बारामती विधानसभा निवडणुकीसाठी २०१४ मध्ये भाजप शिवसेनेच्या वतीने स्वतंत्र निवडणूक लढविण्यात आली होती. यंदा २०१९च्या विधानसभा निवडणुकीबाबत घटकपक्षांसह निवडणूक लढविण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला आहे. मात्र, यंदादेखील भाजपसह शिवसेनेच्या वतीने बारामती विधानसभा उमेदवारीसाठी मागणी करण्यात आली आहे. 

हा मतदारसंघ वर्षानुवर्षे शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे. १९९२ पासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे यंदादेखील शिवसेना विधानसभा निवडणूक लढविणार आहे. याबाबत मागील आठवड्यात ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे भाजपने या मतदारसंघाचा आग्रह न धरता मित्रपक्षाचा धर्म पाळावा, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. राजेंद्र काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले......

 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक