शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनो सावधान..! शहरातील १३८ पाणी नमुने पिण्यास अयोग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:05 IST

- ७,१९५ नमुने तपासले : पाणी उकळून पिण्याचा सल्ला

- अंबादास गवंडी पुणे : गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर पुणे महापालिकेने शहरातील सर्वच भागातील पाणी पिण्यास किती योग्य आहे, याची तपासणी सुरु केली. विशेषत: सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याचे नमुने सातत्याने तपासण्यात येत आहेत. आतापर्यंत ७ हजार १९५ नमुने तपासण्यात आले असून, त्यातील १३८ पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली असून, नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पुणे शहरात जानेवारी महिन्यात जीबीएस या दुर्मिळ आजाराचा उद्रेक झाला होता. यामुळे शहरातील विविध भागातील पिण्याच्या पाण्याचा स्रोत शोधण्यात येत आहे. यात खडकवासला धरण, खासगी विहिरी आणि खासगी रिव्हर्स आॅस्मोसिस (आरओ) प्रकल्पांसह टँकरच्या पाण्याचा समावेश आहे. हा स्रोत शोधून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. हे नमुने महापालिकेचे पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. आतापर्यंत ७ हजार १९५ पाणी नमुने तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. यामधील १३८ पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहेत.

जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात....

राज्यात आतापर्यंत २२४ जीबीएसचे रुग्ण सापडले आहेत. त्यातील १९५ रुग्णांवर निदान झाले आहे. तर राज्यभरात १७८ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. जीबीएसमुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून, सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरात आढळले आहेत. यामध्ये पुणे महापालिका ४६, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावात ९५, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ३३, तर पुणे ग्रामीण भागात ३६ रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांपैकी २६ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, १५ रुग्णांना व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहे.

दूषित पाण्यात ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जीवाणू आढळून येत आहेत. ज्या भागात पाणी दूषित आढळले, त्या भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना पाणीपुरवठा विभागाला देण्यात येत आहे.  - डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, महापालिका

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्यWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपातMuncipal Corporationनगर पालिका